Sakri Crime
Sakri Crime Saam tv
ऍग्रो वन

Sakri Crime : शेतशिवारातून १२ शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरीस; साक्री तालुक्यातील घटना

Rajesh Sonwane

धुळे : साक्री तालुक्यातील कुडाशी व परिसरातील १२ शेतकऱ्यांचे १६ कृषी पंप पांझरा नदी काठावरून चोरीस गेले (Dhule) आहेत. गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र वाढल्याने पोलिसांनी (Police) चोरट्यांचा शोध घ्यावा; असे पत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांना शिवाजी भोये यांनी पोलिस स्टेशनला दिले आहे. (Live Marathi News)

मागील काही दिवसांपासून साक्री (Sakri) तालुक्यातील कुडाशी शिवारातील पांझरा नदीवरील कृषीपंप चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय चोरी (Theft) करणारे चोरटे अजून देखील मिळून येत नाहीत. या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे (farmer) आर्थिक नुकसान होत आहे. नवीन कृषी पंप घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. तसेच शेतात असलेली पिके कोमेजून जात आहेत. वाढत्या उन्हाचा फटका पिकांना बसत असून त्यात कृषी पंप चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरट्यांचा अद्याप शोध नाही 

कृषी पंप चोरी जात असल्याने शेतकरी हतबल झाला असून हे कृषीपंप चोरट्याचा पोलिस अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा, अशी मागणी माजी जि. प. सदस्य व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य शिवाजी भोये यांनी पोलिस स्टेशनला पत्र देऊन केली आहे. चोरांचा तपास करून शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले कृषी पंप मिळून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी केली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election 2024: अमोल किर्तीकरांच्या प्रचारात बाँम्बस्फोटातील आरोपी; भाजपचा खळबळजनक आरोप

Health Tips: मासिक पाळी दरम्यान खा 'हे' पदार्थ, वेदना होतील कमी

Railways: किती वयोगटापर्यंत रेल्वेचा मोफत प्रवास करता येईल?

Pune Crime News : फोटो व्हायरल करायची धमकी देत मुलीवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

Sharad Pawar: राज्यात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला!

SCROLL FOR NEXT