Onion Saam tv
ऍग्रो वन

Onion : अवकाळी पावसाने कांदा उत्पादक संकटात; कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Dhule News : राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने धुळे जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावली आहे. यातच साक्री तालुक्यातील देश शिरवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने झोडपले

भूषण अहिरे

धुळे : अवकाळी पावसाने मोठ्या नुकसान केले आहे. आठवडाभरापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण ऐन कांदा काढणीच्या वेळी पाऊस येत असल्याने कांदा पाण्यात सापडून खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने धुळे जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावली आहे. यातच साक्री तालुक्यातील देश शिरवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने झोडपले असून या परिसरात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णतः भिजल्यामुळे सडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय या कांद्याला कवडीमोल भाव मिळण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.  

सुकविण्यासाठी काढला कांदा 

कांदा काढणीयोग्य झाल्याने कांद्याची काढणी करून त्याला मार्केटमध्ये नेण्यापूर्वी काढून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांनी शेतात सुकवण्यासाठी काढून ठेवलेला कांदा सुकण्या आधीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामध्ये भिजून हा कांदा पूर्णतः सडला आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

भरपाईची मागणी 

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढून ठेवलेले कांदे हे शेतातच पडलेले असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदे अक्षरशः सडून गेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभं ठाकल असून नुकसानग्रस्त शेतीची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन पूर्ववत सुरू

Health tests before joining gym: तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; जीममध्ये व्यायाम करण्यापूर्वी आरोग्याच्या 'या' टेस्ट करून घ्याच

Smartphone Launch: नवा POCO M7 Plus भारतात लाँच, ७०००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा, किंमत किती?

Pune: पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV VIDEO व्हायरल

Janmashtami 2025: श्री कृष्ण जन्माष्टमीला या चूका करू नका, संकटात सापडाल

SCROLL FOR NEXT