Onion
Onion Saam tv
ऍग्रो वन

कांदा बियाणे तीन लाख रुपये क्विंटल

साम टिव्ही ब्युरो

कापडणे (धुळे) : शेतकऱ्यांना नेहमीच रडविणारा आणि कधी-कधी हसविणारा जर कोणी असेल तर तो कांदा आहे. कांद्याची शेती कितींना फायदेशीर आहे, असे विचारल्यास परवडत नाही. किंबहुना कांद्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळही येते. कांद्याचे उत्पादन म्हणजे खाया ना पिया गिलास तोडा बाराना अशीच आहे. तरीही खानदेशी शेतकरी (Farmer) कांद्याचे उत्पादन घेण्याचा नाद सोडत नाहीत. दोन-तीन वर्षांतून एकदा जरी भाव मिळाला तरी दोन वर्षांची कमाई निघते. आता तर येथील युवा शेतकरी कांद्याच्या (Onion) बीजोत्पादनाकडे वळले आहेत. येथील राजा पाटील या युवा शेतकऱ्याला चार एकरांमधून पंधरा ते वीस लाखांचे बीजोत्पादन अपेक्षित आहे. सध्या प्रतिक्विंटले तीन हजारांचा भाव आहे...! अन् तोही वाढताच आहे. (dhule news Onion seeds cost Rs three lakh per quintal)

खानदेशात कांदा उत्पादनासाठी कापडणे परिसर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ‘कापडणेचा कांदा’ म्हटल्यानंतर इंदूर व नागपूरच्या (Nagpur) बाजारपेठेत विशेष भाव मिळतो. कापडणेसह नंदाणे, बुरझड, लामकानी, बोरीस, नेर, कुसुंबा पट्ट्यात कांदा उत्पादन घेण्यात शेतकरी माहिर आहेत.

छंद कांदा नि बीजोत्पादनाचा..

येथील युवा शेतकरी पाटील यांना कांदा उत्पादनाचा छंद आहे. स्पिंकलर अथवा ठिबकने विक्रमी उत्पादन काढतात. गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय भरदार बीजोत्पादनाकडे वळले आहेत. या वर्षी चार एकरांमधून पंधरा ते वीस क्विंटल अपेक्षित आहे. प्रतिक्विंटल तीन हजारांचा भाव मिळाल्यास पाटील यांची आखाजीलाच दिवाळी साजरी होणार आहे.

बियाण्यासाठी तीन ते चार हजारांपेक्षा अधिक भाव अपेक्षित आहे. कांदा बीजासाठी स्वतःचा ब्रॅन्ड निर्माण करायचा आहे. मागील वर्षी दहा क्विंटल बीज बांधावरून घेऊन गेले. या वर्षी दर्जेदार बीज पाहून कृषी अधिकारीही थबकले आहेत.

-राजा पाटील, युवा शेतकरी तथा माजी उपसरपं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT