Onion Saam tv
ऍग्रो वन

भाव खाणारा कांदा पुन्हा रस्त्यावर

भाव खाणारा कांदा पुन्हा रस्त्यावर

साम टिव्ही ब्युरो

धुळे : महिनाभरापूर्वी ४५ ते ५० रुपये व त्यापूर्वी थेट ६० ते ८० रुपये किलोपर्यंत भाव खाणारा कांदा पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला रडवत आहे. धुळे (Dhule) शहरात रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली आठ-नऊ ते दहा रुपये किलोने कांदा विकला जात आहे. भाव नसल्याने कांदा फेकावा की विकासा असा प्रश्‍न कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांपुढे आहे. दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहक मात्र सुखावला आहे. (dhule news Onion prices fall again farmer loss onion crop)

नेहमीप्रमाणे कांदा कधी भाव खातो तर कधी कांद्याला कुणी विचारत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. तशीच स्थिती पुन्हा एकदा आली आहे. महिनाभरापूर्वी ४० ते ५० रुपये किलो दराने कांदा विकला जात होता. त्यामुळे ग्राहक कांद्याकडे अनेक ग्राहक कांद्याकडे फिरकत देखील नव्हते. शिवाय लहान आकाराचा कांदाही यादरम्यान भाव खात होता. त्यामुळे अनेकजण लाल कांद्याऐवजी त्यापेक्षा थोडा स्वस्त असलेला पांढरा कांदादेखील विकत घेत असल्याचे चित्र होते. सद्यःस्थितीत मात्र कांद्याचे भाव गडगडले आहेत. बाजारात कांद्याला ६०० ते ९०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. किरकोळ सहा ते नऊ-दहा रुपये दराने कांदा विकला जात आहे. मध्यंतरी अवकाळी पावसाने यंदा रांगडा कांद्याची आवक उशिरा झाली. अशातच उन्हाळ कांदा शेतकऱ्यांनी विक्रीला आणला आहे. त्यामुळे भावात आणखी घसरण झाली आहे. उन्हाळ कांदा टिकाऊ तर रांगडा कांदा तुलनेने कमी टिकतो. या पार्श्‍वभूमीवर (Farmer) शेतकऱ्यांचा कल विक्रीकडे वाढत आहे. मात्र, उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कांद्याचे भाव मार्चअखेरीस घसरतात असाच आजवरचा अनुभव यंदाही पाहायला मिळाला. उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. व्यापारी अत्यंत कमी भावाने कांदा घेत असल्याने बरेच शेतकरी स्वतःच हा कांदा शहरात रस्त्यांवर धरून बसलेले पाहायला मिळत आहेत. याशिवाय काहीजण वाहनातून गल्लोगल्ली कांदा विकत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. काही छोटे व्यावसायिकदेखील हा कांदा विकत आहेत.

ग्राहक मात्र सुखावला

कांद्याचे भाव कमी झाल्याने ग्राहक मात्र सुखावला आहे. साधारण दहा रुपये किलो दराने कांदा मिळत असल्याने अनेकजण जास्त कांदा घरी घेऊन जात आहेत. मात्र, हा कांदा पुन्हा कधी ग्राहकाच्या डोळ्यात अश्रू आणेल हे सांगता येत नाही. एकूणच कांद्याचे हे गणित कधी शेतकऱ्याला तर कधी ग्राहकाला रडवत असतो हेच खरे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

SCROLL FOR NEXT