Farmer 
ऍग्रो वन

पिकांवरील रोगाचे शेतकऱ्यांसमोर संकट

पिकांवरील रोगाचे शेतकऱ्यांसमोर संकट

भूषण अहिरे

धुळे : पावसाअभावी पहिलेच पीक वाया गेल्याने दुबार पेरणी करावी लागली. यानंतरही आता शेतकऱ्यांसमोर पिकावर रोगावर नियंत्रण मिळवण्याचे नवीन संकट उभे आहे. पाऊस नाही त्‍यात ढगाळ वातावरण असल्‍याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. (dhule-news-no-rain-and-Crisis-of-crop-disease-in-front-of-farmers)

धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी देखील समाधानकारक हजेरी लावलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केलेले पीक संपूर्ण वाया गेले आहे. त्यानंतर दुबार पेरणी केल्यानंतरही जसं तसं पीक वाढी लावल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर रोगाचा प्रादुर्भावाचं संकट उभा टाकला आहे.

दुबार पेरणीचा खर्च आता महागडी औषधी

दुबार पेरणी केल्यानंतर ही रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता महागडे औषध फवारावे लागत आहेत. एवढं सगळं केल्यानंतर देखील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्च तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडेल का असाच प्रश्न शेतकऱ्याला भेडसावू लागला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT