Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकाचे नुकसान

अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकाचे नुकसान

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्‍ह्यातील काही भागात सोमवारी संध्याकाळी अवकाळी (Rain) पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेल्‍या (Dhule News) नुकसानीची पाहणी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षांनी केली. (Maharashtra News)

धुळे तालुक्यातील नेर, कुसुंबा यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले असल्याचे दिसून आले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अश्विनी पवार तसेच नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे व जिल्हा परिषदेचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर पाहणी करण्यासाठी पोहोचले.

पंचनामे करण्याच्‍या सुचना

गहू व हरभरा या पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कृषी विभागाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांतर्फे देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT