Maize Crop Saam tv
ऍग्रो वन

Maize Crop : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

Dhule News : मक्याला नंतरच्या कालावधीत चांगला दर मिळाला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल मका लागवड करण्याकडे अधिक राहिला आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी मका लागवडीवर अधिक भर दिला आहे. यामुळे यंदा मका लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र मका पिकावर आता लष्करी आळीचा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे. या शिवाय पावसाच्या लहरीपणामुळे मका पिकाची हवी तशी वाढ झाली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

गतवर्षी धुळे (Dhule) तालुका व परिसरात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने मिळेल त्या भावात कापूस विक्री करावी लागली होती. तर मक्याला नंतरच्या कालावधीत चांगला दर मिळाला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल मका लागवड करण्याकडे अधिक राहिला आहे. धुळे तालुक्यात (Maize Crop) मका लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व कमी पावसावर मका पिकाची पेरणी करत पिक वाढीस लावले आहे. परंतु आता मक्का पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.  

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी मका या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली असून, या मका पिकावर सध्या लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात धुडगूस घातल्यामुळे शेतकरी चांगले चिंतेत सापडले आहेत. लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे (farmer) शेतकऱ्यांसमोर लष्करी अळीचे मोठ संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. या लष्करी अळीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याच्या महत्त्वपूर्ण सूचना कराव्यात अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यां तर्फे करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन

Red Dress For Christmas: ख्रिसमस पार्टीसाठी रेड ड्रेसचे 5 लेटेस्ट पॅटर्न; तुम्ही दिसाल एकदम कडक

Maharashtra Live News Update: मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT