Dhule Rain Saam tv
ऍग्रो वन

Dhule Rain : तासाभराच्या पावसात होत्याचं नव्हतं झालं; शेतकऱ्याला अश्रू अनावर

Dhule News : दोन दिवसांच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मायबाप सरकार लक्ष देत नसल्यामुळे आत्महत्या करणेच सोपा उपाय असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्याने व्यक्त केली

भूषण अहिरे

धुळे : मागील दोन दिवसात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये आतोनात नुकसान झाले आहे. यात धुळे जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने कहर केला आहे. अवघ्या तासाभराच्या पावसाने होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. जोरदार झालेल्या पावसाने डोळ्यादेखत पाच एकर मधील संपूर्ण शेवगा पिक उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याने हंबरडा फोडला. 

हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. हीच परिस्थिती धुळे जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे पाहण्यास मिळत आहे. 

कर्ज कसे फेडायचे याची चिंता 

धुळे तालुक्यातील वडेल शिवारात रामदास मोरे या शेतकऱ्याचं उभ्या पिकाचं पावसामुळे नुकसान झाले आहे. पाच एकर क्षेत्रात शेवग्याची लागवड करण्यात आली होती. मात्र वारा व पावसाचा तडाखा बसल्याने अवघ्या तासाभरात शेवगा पीक उध्वस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. सावकारी कर्ज आणि बँकेच कर्ज फेडण्याची ताकद उरली नसून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली.  

पावसाचा कहर, फळ बागांनाही फटका
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरड मोडल असून सततच्या पावसामुळे फळबागांनाही फटका बसला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथील हजारो हेक्टरवरील मोसंबी पिकाचा चिखल झाला असून आता लेकर बाळ शिकवायची कशी? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. लाखो रुपये खर्च करून विकत पाणी घालून मोसंबीला जोपासले होते. मात्र पावसाने होत्याच नव्हतं केल आहे; असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT