Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपविले जीवन

कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : वाडी (ता. शिंदखेडा) येथील ४५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने (Farmer) बुधवारी (११ जानेवारी) दुपारी गावशिवरातील विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू्ची नोंद करण्यात आली. (Letest Marathi News)

वाडी येथील शेतकरी लोटनसिंह इंद्रसिंह गिरासे यांची गावशिवरात तीन एकर शेतजमीन असून, त्यांनी मालपूर (ता. शिंदखेडा) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतून पीककर्ज व शेतीपयोगी कर्ज घेतले होते. नैसर्गिक संकटामुळे कर्ज फेडता येत नसल्याच्या विवंचनेतून बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गावशिवरातील मोहनसिंह निंबा गिरासे यांच्या विहिरीत उडी मारत आत्‍महत्‍या केली. त्यांच्‍या पश्‍चात पत्नी व दोन मुले आहेत.

गिरासे यांनी विहिरीत उडी मारल्याचा फोन आल्याने गावातील ललित गिरासे, रवींद्र गिरासे, मानसिंह गिरासे आदींनी त्यांना विहिरीतून बाहेर काढले. खासगी वाहनाने शिंदखेडा (Shindkheda) येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत गवांदे यांनी सायंकाळी साडेसहाला मृत घोषित केले. याबाबत चुलत पुतणे मोहनसिंह प्रतापसिंह गिरासे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून आकस्मिक मृत्यू्ची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT