Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडी ठार; शेतात काम करताना घडली घटना

Dhule News : नेहमीच्या नित्यनियमाप्रमाणे शेती काम करत असताना वीज खांबाजवळ बैलजोडीसह माळी आले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला

Rajesh Sonwane

कापडणे (धुळे) : मान्सून दाखल झाल्याने शेती मशागत कामांना वेग आला आहे. पेरणी करण्यापूर्वीची लगबग सुरु असताना शेतात काम करताना विद्युत तारांना स्पर्श होऊन विजेच्या जोरदार झटक्याने तरुण शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना धुळे जिल्ह्यातील कापडणे येथे घडली. 

चंद्रकांत मिठाराम माळी (वय ४०) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रकांत माळी हे दररोज व्हॅनने येथील (Farmer) शेतकऱ्यांचा भाजीपाला शहाद्यातील भाजीपाला बाजारामध्ये घेऊन जात सकाळी दहापर्यंत परत येत होते. दरम्यान सोमवारी शेती काम करत असताना वीज खांबाजवळ बैलजोडीसह माळी आले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात बैलजोडी जागीच ठार झाली. तर माळी (Dhule) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

चंद्रकांत माळी यांचा यावर्षी फेब्रुवारीत चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. संसाराला सुरवात झाली असतानाच चंद्रकांत माळी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर पत्नी, आई- वडील, भाऊ- बहीण यांनी एकच आक्रोश केला.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CRPF मध्ये होणार मोठा बदल; ३० वर्षांनंतर 'लान्स नायक' आणि 'नायक' पदे पुन्हा होणार सुरू, किती असते सॅलरी?

रिसॉर्टला भीषण आग! 10 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जखमी

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला प्रतिसाद; शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदेंचा सवाल

विधिमंडळाचे उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्षांच्या अधिकारांना कात्री; लोकशाहीच्या मंदिरात संघर्ष पेटला

Car Cabin Air Filter: कारची एसी फुल्ल, पण कुल होत नाही, केबिन फिल्टर कधी बदलावा?

SCROLL FOR NEXT