सुट्टीचा दिवस असल्याने छत्रपती संभाजीनगर-खुलताबाद मार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी झाली. घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक आणि भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, आमदार प्रशांत बंब यांनी परिस्थितीची पाहणी करत थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. वाहनचालकांना योग्य दिशेने जाण्याच्या सूचना देत त्यांनी काही काळ स्वतः वाहतूक नियमन केले. सुट्टीच्या दिवशी खुलताबादमध्ये होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गडचिरोलीत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या वतीने आयोजित या रॅलीचे उद्घाटन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर जयस्वाल स्वतः मोटरसायकलवर स्वार होत रॅलीत सहभागी झाले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह ३०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रॅलीत सहभाग घेतला. तिरंगा हातात घेऊन काढलेल्या या रॅलीमुळे शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
गडचिरोलीत १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात अभियानाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. २१ ऑगस्टला तीन किलोमीटरची ‘वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील स्टंटमॅन भगतसिंग अर्थात भगवान फरस यांनी धाडसी बाइक स्टंट सादर करत भारतमातेला अनोखी मानवंदना दिली. पोलीस परेड मैदानाजवळ तसेच राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी हातात तिरंगा घेत चित्तथरारक स्टंट केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, योग्य प्रशिक्षणाशिवाय कोणीही स्टंटची नक्कल करू नये, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात भारताच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आणखी मोठा स्टंट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
- नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावर वाहन चालकांची घसरगुंडी
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्रंबकेश्वर रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाचा वाहन चालकांना फटका
- कामांमुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने दुचाकी वाहनं घसरून अपघाताच्या घटना
- नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावर पेगलवाडी फाटा परिसरात रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात
- भाविकांनी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जायचं कसं?
- प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात गेल्या दहा दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या कुटुंबाच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.तसेच काल सायंकाळी घुले कुटुंबीयांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेत निवेदन सादर केले होते...यावेळी सुनेत्रा पवार यांनी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती...यानंतर आता सीआयडी ऍक्टिव्ह मोडवर आले असून सीआयडी चे वरिष्ठ अधिकारी यशवंत काळे यांनी आज उपोषण स्थळी दाखल होत घुले कुटुंबीयांशी चर्चा केली.जोपर्यंत पुरवणी जबाब नाव असलेल्या सौरव सोनवणे याला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार घुले कुटुंबीयांनी केला असून आता सीआयडी या प्रकरणात नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज चाकण MIDC मधील 20 उद्योग धंदे बाहेर जाण्याच्या बतयारीत आहेत. चाकण midc मध्ये उद्योग धंद्याचा वास यायला हवा मात्र इथे आता कचऱ्याचा वास येत आहे. इथे रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा आणि विजेचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे.
एमआयडीसी आणि पीएमआरडीएने केलेला नियोजनामुळे चाकण मधून बाहेर पडणं कठीण झालं आहे. उद्योग मंत्री उद्या रविवार असल्याने चाकण येथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मात्र मी उद्योग मंत्रांना आवाहन करतो की त्यांनी रविवार ऐवजी वर्किंग डेला या भागाची पाहणी करावी. कोणताही कन्व्हाय न घेता त्यांनी या ठिकाणी प्रवास करावा आणि समस्या समजून घ्यावी अस आवाहन आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उद्या सामंत यांना केला आहे.
राज्यातील सर्वात मोठी एमआयडीसी पैकी एक असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांतील खड्डे आणि वाहतूक कोंडीची आज युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून पी एम पी एम एल च्या बस ड्रायव्हरची रस्त्यातील खड्डे आणि वाहतूक कोंडी विषयी संवाद साधला आहे. बस ड्रायव्हरने देखील चाकण एमआयडीसीची रस्त्यांची खड्डे आणि वाहतूक कोंडीची व्यथा आदित्य ठाकरे यांच्या पुढे मांडून हा प्रश्न सोडविण्ची मागणी केली आहे.
15 ऑगस्टसह विकेंडमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.. गर्दीच्या पार्श्वभुमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतूक नियमात बदल करण्यात आलेत.. भंडारदरा धरण येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा, शेंडी गाव अशी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.. वाहतूक कोंडी होऊन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
- फुटाळा तलावावर नागपूरकरात तरुणाईने खास पद्धतीमध्ये स्वातंत्र्य उत्साहात साजरा केलाय..
- राष्ट्रभक्तीचा ‘मिशन राजपथ’मध्ये सामूहिक राष्ट्रगीत करण्यात....
- स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपुरातील फुटाळा तलावावर आज राष्ट्रभक्तीचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
- ‘एक वादळ भारताचं’तर्फे आयोजित ‘मिशन राजपथ – Stand for Nation’ या कार्यक्रमात शेकडो नागपूरकर सहभागी झाले.
- राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने फुटाळा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारून गेला होता.
- यावेळी ढोल तशा पथकासह आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय..
गुढगाभर पाण्यात उभे राहून ध्वजारोहण केल जात असल्याचा व्हिडीओ रायगडमध्ये व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अलिबाग तालूक्यातील धाकटे शहापुर येथील असून येथील एका व्यक्तील ने पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी गटारी जगा अडवून ठेवल्याने हे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात उभे राहून विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी ध्वजारोहन केले. या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे.
ज स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण केल्या नंतर पालकमंत्री पद आपल्यालाच मिळेल याचा पुनरुच्चार मंत्री भरत गोगावले यांनी केला. जसा ध्वजारोहणाचा मान मिळाला तसाच पालकमंत्री पदाचाही लवकर मिळेल असे भरत गोगावले म्हणाले. पालकमंत्री पद मिळण्यात कुठलाही अडथळा राहिलेला नाही म्हणूनच आम्ही हे ठामपणे बोलत आहोत.
महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर मंत्री हसन मुशरीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरतहून नागपूरकडे येत असताना रस्त्यांची दुरवस्था पाहून आपल्याला लाज वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केतकावळे (पुरंदर) ग्रामपंचायतीमध्ये सन २०२४ मध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅड खरेदी आणि वाटप उपक्रमात तब्बल ७५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज पुरंदर पंचायत समितीसमोर हलगी वाजवून आणि गळ्यात सॅनिटरी पॅड आणि पैश्यांची माळ गळ्यात घालून अनोखे आंदोलन केले.
सांगलीच्या कुपवाड नजीक कचरा फेकण्याच्या वादातीन जोरदार मारामारी झाली आहे,यामध्ये एकाच कुटुंबातील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. विघ्नहर्ता कॉलनी येथे रहाणाऱ्या व्यक्तीचे शेजारच्या कुटुंबासोबत कचरा फेकण्यातून वाद झाला,या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झालं,यामधून एका कुटुंबातील पती-पत्नी हे गंभीर जखमी झालेत
- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन
- नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात
- काही दिवसांपूर्वी याच शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते
- कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेचे आश्वासन मात्र अद्याप चर्चा नाही
भोर तालुक्यातील करंदी खेबा गावातील रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने शाळकरी मुलांनी चक्क खड्ड्यांमध्ये भात लावणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती, मंत्रीपद न द्या अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत
सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं प्रवेश झाला नाही
मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत,अशी इच्छा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती.
सातारा शहरातील पोवई नाका येथे सातारा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचे आज मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने या स्मारकाचे अनावरण केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सांगोला येथील सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या राजेश्री नागणे यांनी तालुक्यात 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार आज वृक्ष लागवडीचा प्रारंभ केला. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला दोन झाडे देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या आई वडीलांच्या नावाने वृक्ष लागवड केली जाणार आहे.
पोलिस ठाण्याबरोबरच येथील सर्व शासकीय कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
- वर्धेच्या बसस्थानकासमोरील परिसरात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ
- एकाच दिवसात तब्बल १९ नागरिकांना कुत्र्याने घेतला चावा
- जखमी नागरिकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार
- चावा घेतलेल्या सर्व नागरिकांना अँटी रॅबिज लस देण्यात आली
- एका वयोवृद्ध महिलेला कुत्र्याने गंभीर स्वरूपात चावा घेतल्याची माहिती
- घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लोणावळ्यात टायगर पॉईंट भुशी डॅम रोडला वाहनांच्या रंगात रांगा सलग आलेल्या सुट्ट्यामुळे पर्यटक आपल्या खासगी वाहनाने लोणावळ्यात दाखल झाल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.मात्र पोलिस प्रशासन वाहने बाजूला काढण्याचे फक्त देखावा करीत आहे.
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेलं बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झालय. भारतीय स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने धरण परिसरात मनमोहक आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
हिंगोली मध्ये भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादीचे मंत्री आणि भाजप कडून नुकतेच निवडून गेलेले राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांच्या मध्ये मोठे नाराजी नाट्य रंगले आहे, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापासून रोखल्याचं रामराव वडकुते यांनी म्हटलं आहे.
१५ ऑगस्टची सुट्टी आणि जोडून आलेला शनिवार रविवार यामुळे सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. श्रावणाचा पहिला शनिवार असल्याने राज्यभरातून पर्यटक सह्याद्रीच्या कुशीत दाखल झाले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव एसटी स्टँड पासून साधारण तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. .अतिशय संथ गतीने वाहने पुढे सरकत आहेत. सलग सुट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने पावसाळी पर्यटनासाठी रायगडात दाखल होत आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेषतः कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने पर्यटक, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंगोली मध्ये शक्तिपीठ महामार्गात जमीन भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बैठकीदरम्यान जोरदार गोंधळ घातला आहे मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निवेदन देण्यासाठी आलेल्या या शेतकऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत चर्चा करण्याच आश्वासन दिल होतं.
जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्पावरून झालेल्या जनसभेत पत्रकाराला धमकी दिल्याच्या आरोपावरून वाद निर्माण झाला आहे. पत्रकाराला १५ ऑगस्टनंतर बघून घेतो, असे आमदार शरद सोनवणे यांनी म्हटल्याचा आरोप असून, पत्रकारांकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे.
सलग आलेल्या सुट्टया आणि 15 ऑगस्ट , देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि शिवप्रेमी किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. तीरंगा आणि भगवे झेंडे हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत पर्यटक आपला उत्साह व्यक्त करीत आहेत. धुक आणि रिमझिम पावसात हिरवाईने नटलेल्या रायगडाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटक आणि शिवप्रेमींनी रायगड बहरला आहे.
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- नाशिकच्या विभागीय आयुक्तालयासमोर ध्वजारोहण सोहळ्यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न
- आत्मदहन करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला
- अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून मंत्री गिरीश महाजन उपस्थित असलेल्या ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी आत्मदहनाचा केला प्रयत्न
यवतमाळ येथे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
नांदेडमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, आमदार मनोज कायंदे, संजय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरीच्या पोलीस ग्राउंडवर रंगला सोहळा
आकर्षक आणि दिमागदार पोलीस संचलन
अलेक्स श्वानाची मानवंदना ठरली लक्षवेधी
यावेळी पोलीस पथक होमगार्ड पथक महिला पोलीस पथक नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे संचलन
पालकमंत्र्यांकडून वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमित कांबळे या तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न
प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या कागदपत्रांचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचा कांबळे यांचा आरोप
संबधित परिवहन अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्यानं उचललं पाऊल
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असताना प्रकार
- नागपुरातील काटोल तालुक्यातील चिखलागढ शिवारात बनावट दारू निर्मितीचा कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
- शेतातील घरावर छापा टाकून देशी-विदेशी बनावट दारू आणि निर्मितीसाठी लागणारं साहित्य असा ५४ लाख ८१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये शासकीय ध्वजारोहण संपन्न.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत.
पाण्याखाली तिरंगा घेऊन सायकल चालवत अमरावती शहर पोलीस मधील हेड
कॉन्स्टेबल प्रवीण आखरेंचे अनोखे ध्वजवंदन...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला अनोख्या पद्धतीने सलाम...
आखरे यांनी पाण्याखाली तिरंगा ध्वजासह सायकल चालवून ध्वजवंदनाचे प्रात्यक्षिक सादर केले.
- नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा
- ध्वजारोहण सोहळ्यानंतर पदक प्राप्त पुरस्कर्त्याना पुरस्कार प्रदान केले जाणार
- कुंभेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मोबाईल टॉवर पोलीस व्हॅनच लोकार्पण केलं जाणार
पुण्याच्या भोर तालुक्यात भात शेतीच्या खाचरात शेवाळाच संकट.. शेवाळ साचत असल्याने शेतकरी हवालदिल
जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर पुण्यातील भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात भात लावणी अंतिम टप्प्यात आलीय
स्वातंत्र्य दिनी २५ हजार डोंबिवलीकर विश्वविक्रमाचे साक्षीदार होणार
भव्य तिरंगा रॅली’तून ३५ हजार चौरस फुटांचा राष्ट्रध्वज घेऊन नागरिक सहभागी होणार
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व सामाजिक संस्थांकडून आयोजन
या ऐतिहासिक उपक्रमात १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विठुरायाला तिरंगा उपरणे परिधान करण्यात आल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
- शहरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडात रणजित सफेलकरला जामीन
- मुख्य आरोपी रणजित सफेलकरला सत्र न्यायालयाने विविध अटींसह जामीन मंजूर केला.
- न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी हा निर्णय दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.