Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : दुष्काळ जाहीर करा; हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर पायी मोर्चा

Dhule News : धुळे व नंदुरबार जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस पडला नाही. यामुळे दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

भूषण अहिरे

धुळे : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने दुष्काळ (Dhule) सदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे. यामुळे धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. हजारो (Farmer) शेतकरी यात सहभागी होऊन मंत्रालयाकडे पायी निघाले आहेत. (Latest Marathi news)

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात यंदा अपेक्षित (Rain) पाऊस पडला नाही. यामुळे दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने मात्र दुष्काळ जाहीर करताना काही तालुक्यांचाच समावेश केला आहे. परंतु संपूर्ण जिल्हाच दुष्काळी असून राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यानुसार (Nandurbar) सत्यशोधक शेतकरी सभेच्या माध्यमातून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत माघार नाही 

हजारो शेतकरी पायी मोर्चा घेऊन मंत्रालयाच्या दिशेने नंदुरबारहून निघाले असून आज रात्रीच्या मुक्कामानंतर धुळ्यातून पुन्हा पुढे मार्गस्थ झाले आहेत. हे पायी निघालेले मोर्चेकरी बिऱ्हाड सोबत घेऊन धुळे आणि नंदुरबार जिल्हा दुष्काळ जाहीर करावा; या मागणीसाठी निघाले आहेत. राज्य सरकार जोपर्यंत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मोर्चेकर्‍यांनी घेतली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT