Cotton  Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : मजूर मिळत नसल्यामुळे कापूस वेचणी होईना; शेतकरी हतबल, कापूस शेतात काढणी विना तसाच

Dhule News : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत कापूस काढून त्या ठिकाणी दुसऱ्या पिकाची तयारी शेतकरी करत असतात.

भूषण अहिरे

धुळे : कापूस हंगाम संपत आला असून बहुतांश शेतांमध्ये कापूस काढणीला आला आहे. परंतु सद्यपरिस्थितीत वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती सर्वदूर सारखीच असल्याचे पाहण्यास मिळत आहे. धुळे जिल्ह्यात देखील हे चित्र असल्याने शेतकरी हतबल झाला असल्याने कापूस काढणी विना तसाच राहिला आहे. 

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत कापूस (Cotton) काढून त्या ठिकाणी दुसऱ्या पिकाची तयारी शेतकरी करत असतात. परंतु सर्वच ठिकाणी कापूस काढण्याची लगबग शेतकऱ्यांची (Farmer) सुरू झाली असल्यामुळे मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा शेतकऱ्यांना भासू लागला आहे. त्यामुळे बहुतांश शेतात कापूस काढणी विना तसाच आहे. कापूस काढणी होत नसल्याने उन्हामुळे कापसाचे वजन देखील कमी होण्याची भीती असते. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे. 

धुळे (Dhule) जिल्हाभरात निम्म्याहून अधिक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला कापूस काढून त्या ठिकाणी दुसरे पिक घेण्यासाठी शेतीची मशागत देखील सुरू केली आहे. परंतु वाढीव दर देऊन देखील मजूर मिळत नसल्यामुळे काढणीला आलेला कापूस काढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे. तर मजूर नसल्याने काही शेतकरी स्वतः घरच्या घरी कापूस वेचणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT