Sugarcane Saam tv
ऍग्रो वन

आगीत चार एकरचा ऊस जळून खाक

आगीत चार एकरचा ऊस जळून खाक

साम टिव्ही ब्युरो

शिंदखेडा (धुळे) : तालुक्याचे माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या नेवाडे शिवारात असलेल्या चार एकरातील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने त्या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग विझविण्यासाठी शिंदखेडा, दोंडाईचा (Dondaicha) येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. (dhule news Burn four acres of sugarcane in the fire)

शिंदखेडा (Shindkheda) शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेवाडे गावाच्या शिवारात माजी आमदार रामकृष्ण पाटील यांचे शेत आहे. यातील चार एकरात उसाची लागवड करण्यात आली होती. मंगळवारी (ता.१७) पहाटे पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे शेतातील उसाला (Sugarcane) आग लागली. हवा असल्यामुळे आगीने काही वेळेतच उग्र रूप धारण केले. आग लागल्याचे सालदाराच्या लक्षात आल्यावर त्याने तत्काळ ही माहिती श्री. पाटील यांना दिली. पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ऊस जळून खाक झालेला होता.

चार लाखाचा नुकसान

आगीवर नियंत्रण करण्यासाठी शिंदखेडा व दोंडाईचा येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आग विझविण्यात आली. या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाल्याने सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर देखील कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती. शिंदखेडा तालुक्यात काही प्रमाणात बागायती शेती करण्याचे धाडस शेतकरी करतात. परंतु अशा कारणांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. पर्यायाने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडतो. त्यामुळे अशा कारणांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास तत्काळ संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT