Bacchu Kadu
Bacchu KaduSaam Tv

"हनुमान चालीसा, भोंगे यासारखे मुद्दे उपस्थित करणारे मूर्ख"; बच्चू कडूंचा प्रहार

Bacchu Kadu :
Published on

अमरावती : राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर विरोधकांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे नेते एकमेकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. अशातच हनुमान चालीसा किंवा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणे, हे या लोकांचे राजकीय अपयश आहे. यांना मूर्ख म्हटले तरी काही हरकत नाही, अशी गंभीर टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. (Amravati Minister Bacchu Kadu Latest News)

Bacchu Kadu
'महिलांवर हात उगाराल तर हात तोडू', सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहुल आणि दुर्गम अशा जिवती तालुक्यात अनेक गुड्यांवर लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना बच्चु कडू म्हणाले की, "हनुमान चालीसा किंवा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करणे, औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणं हे या लोकांचे राजकीय अपयश आहे. यांची आपण मूर्ख म्हणून गगना केली तरी काही हरकत नाही".

दुसरीकडे त्यांनी बच्चु कडू यांनी माध्यमांना देखील सुनावलं आहे. आज ब्रेकिंग देणाऱ्या लोकांना माध्यमे स्थान देत असून त्यांना मोठे केले जात आहे. आज विधायक कार्यक्रम कमी आणि चालीसासारखे ब्रेकिंग कार्यक्रम अधिक दाखवले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी माध्यमांवर केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com