Dhule Rain Saam tv
ऍग्रो वन

Dhule Rain : धुळे जिल्ह्यात ५१ टक्के पेरण्या पूर्ण; मका, कापूस पेरणीवर शेतकऱ्यांचा भर

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात यंदा सुरवातीलाच मान्सूनचे आगमन झाले होते. मात्र हा पाऊस पेरणी योग्य नव्हता. दरम्यान मध्यंतरी काही भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम आटोपले. तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत देवल ५१ टक्केच पेरण्या झाल्या असून उर्वरित भागात दमदार पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या खोळंबल्या आहेत. 

धुळे (Dhule) जिल्ह्यात यंदा वरूण राजाचे वेळेवर आगमन झाले आहे, त्यामुळे वेळेवर पेरण्या होऊन उत्पादनही चांगले येणार असल्याची शेतकऱ्यांना आशा लागून होती, मात्र, वेळेवर दाखल झालेल्या वरूणराजाने जिल्ह्यातील ठराविक भागातच हजेरी लावली आहे. अद्यापही (Shindkheda) शिंदखेडा, साक्री, शिरपूर या तालुक्यांमध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळे जून महिना अखेरीपर्यंत धुळे जिल्ह्यात फक्त ५१ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. तर काही भाग अजूनही कोरडाच आहे. 

जिल्ह्याभरामध्ये १२३ मिलिमीटर इतक्या पावसाची (Rain) नोंद झाली असून, अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा अद्यापही आभाळाकडेच लागून राहिल्या आहेत. पेरणी केलेल्या भागात मका, कापूस, सोयाबीन त्याचबरोबर भुईमुगाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर आतापर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये शेतकऱ्यांनी मका व कापूस पिकावरच जोर दिला आहे. तर सोयाबीन लागवड करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT