Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उन्हाळी कांदा काढणीला आल्यावर अवकाळीचा तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला होता, तर काहींचा कांदा शेतातच होता

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ऐन कांदा काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. यातच मार्केटमध्ये विक्रीसाठी शेतकऱ्याने कांदा आणल्यानंतर दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे लागलेला खर्च देखील निघणे कठीण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्याने पाणी आले आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उन्हाळी कांदा काढणीला आल्यावर अवकाळीचा तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला होता, तर काहींचा कांदा शेतातच होता. यातच अवकाळी पावसामुळे कांदा भिजला आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे. त्यातच जो कांदा निघाला, तो विक्री करण्याची वेळ आल्यावर कांद्याचे दर घसरले आहेत. 

१० रुपये प्रतिकिलोवर दर 

दोन महीन्यापुर्वी ४० रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर १० रुपये प्रति किलोवर आला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ऐकीकडे गृहीणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे. त्यामुळे कांद्याला किमान २५ ते ३० रुपये दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांतुन केली जात आहे. 

शेतकऱ्यांपुढे संकट कायम 

शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका सुरूच आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली होती. तर निघालेल्या मालाला देखील चांगला दर मिळाला नव्हता. तर आता रब्बी हंगामातील पिके तसेच उन्हाळी कांदा काढणीवर आला असताना अवकाळी पावसामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. खराब झालेल्या मालाला आता चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची मोठी कारवाई, ५ आमदार तडकाफडकी निलंबित; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pune : शौचालयाला जाणाऱ्या महिलेची काढली छेड, जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

Nagpur Summer Tourism: नागपूरजवळची 'ही' थंड हवेची ठिकाणं माहितीयेत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा पाहाच...

Pune News: वीजपुरवठा खंडित झाला, भाजपचे नगरसेवक महावितरण कार्यालयात जाऊन झोपले; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT