Groundnut Crop Saam tv
ऍग्रो वन

Groundnut Crop : काढणीला आलेल्या भुईमूगाला लागली बुरशी; अवकाळीने शेतकऱ्याचे मोठं नुकसान

Dharashiv News : उन्हाळ्यात प्रामुख्याने शेती तयार करण्याची लगबग पाहण्यास मिळत असते, मात्र अवकाळीमुळे सर्व चित्र बदलून गेले आहे. शेतातील पीक काढणी देखील होऊ शकत नसल्याने हे पीक खराब होत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: अवकाळी पाऊस राज्यभरात होत आहे. कुठे कमी तर कुठे पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा, मक्याच्या नुकसानीनंतर भुईमूंग उत्पादक शेतकऱ्याला देखील याचा फटका बसला आहे. कारण काढणीला आलेल्या भुईमूंगला बुरशी लागली आहे. तर काही ठिकाणी जमिनीतच शेंगाना अंकुर फुटल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

राज्यातील अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसानीची झळ शेतकऱ्यांना बसू लागली आहे. रोज पावसाची हजेरी लागत असल्याने शेतातील कामे करणे देखील शेतकऱ्यांना आता कठीण झाले आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने शेती तयार करण्याची लगबग पाहण्यास मिळत असते, मात्र अवकाळीमुळे सर्व चित्र बदलून गेले आहे. शेतातील पीक काढणी देखील होऊ शकत नसल्याने हे पीक खराब होत आहे. आता भुईमूंग उत्पादक शेतकऱ्याचे देखील नुकसान होऊ लागले आहे. 

धाराशिव जिल्ह्यात ३०० हेक्टरवर नुकसान 

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. शासकीय आकडेवारीवरुन आतापर्यंत जिल्ह्यातील ३०० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. दरम्यान तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारातील शेतकरी नागनाथ भाऊ भांजी यांनी लाखो रुपये खर्च करून जागविलेले पिक मातीमोल झाले असुन काढणीला आलेल्या भुईमूगाला अवकाळी पावसामुळे बुरशी लागल्याने शेतकऱ्याना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.  

हातातोंडाशी आलेला घास हिरावला 
बुलढाणा : सध्या भुईमूंग काढणीला वेग आला आहे. अशातच गेल्या दहा- बारा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ उडत असून खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेंग भिजली आहे. आधीच वातावरणातील बदलामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भुईमुगाच्या शेंगा पावसात भिजल्याने भावांमध्ये मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death: प्रसिद्ध गायकाचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; संगीत विश्वात शोककळा

Maharashtra News Live Update: पेपर फुटी प्रकरणानंतर नीट परीक्षेच्या केंद्रावर परीक्षेवेळी आता पोलिसांची नजर

६ फुटीर खासदारांची काय डील झाली? कोणाला मिळणार मंत्रिपद? संजय राऊतांचा धक्कादायक दावा

टपरीसारखा चहा घरी बनत नाही? मग टाका हा 1 स्वादिष्ट मसाला, न पिणारेही चहा पितील

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर, 24K, 22K,18K तोळ्याची किंमत किती?

SCROLL FOR NEXT