Dharashiv News Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Purchase : सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या अर्धा किमीपर्यंत रांगा; तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचा मुक्काम

Dharashiv News : मध्यंतरीच्या कालावधीत बारदानाअभावी सोयाबीन खरेदी बंद होती. यामुळे शेतकरी ताटकळत थांबले आता पुन्हा खरेदी सुरु करण्यात आली असून खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांनी आणलेल्या वाहनांच्या रांगा

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : सोयाबीनला चांगला भाव नसल्याने शेतकरी विक्री करत नाही. मात्र सोयाबीन विक्री करण्यासाठी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर आणू लागले आहे. मध्यंतरी बारदान अभावी खरेदी बंद करण्यात आलेली होती. मात्र खरीदी सुरु झाल्याने आता केंद्राच्या बाहेर अर्धा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर मागील तीन दिवस झाले शेतकरी सोयाबीन घेऊन रांगेत उभे असून मुक्कामी थांबले आहेत.

सोयाबीन विक्रीसाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. धाराशिव जिल्ह्यात २९ हमीभाव खरेदी केंद्र असून याठिकाणी सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. दरम्यान मध्यंतरीच्या कालावधीत बारदाना अभावी सोयाबीन खरेदी बंद होती. यामुळे शेतकरी ताटकळत थांबले होते. मात्र आता पुन्हा खरेदी सुरु करण्यात आली असून या खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांनी आणलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत आहेत. 

८० हजार शेतकऱ्यांकडील खरेदी बाकी 

हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी जिल्ह्यातील ८९ हजार ६२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून मागील दोन महिन्यात यापैकी केवळ ७ हजार ५७४ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. तर उर्वरित ८० हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होणे बाकी आहे. आठ दिवसात ही खरेदी पूर्ण कशी होणार? हा प्रश्न निर्माण झाला असून याच अनुषंगाने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर गर्दी करत आहेत.  

मुदत वाढविण्याची मागणी 

दरम्यान सोयाबीन विक्री होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी तीन- तीन दिवस झाले वाहने रांगेत उभी करून सोयाबीन विक्रीसाठी वाट पाहत आहेत. याकरिता येथेच मुक्काम करत आहेत. दरम्यान सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राना खरेदीसाठी आता ३१ जानेवारी पर्यंत मुदत आहे. मात्र आणखी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT