Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Dharashiv news : पिक कर्ज वसुलीसाठी हजारो शेतकऱ्यांची बँक खाती केली होल्ड; ऐन मशागतीच्या वेळी बँकांकडून शेतकऱ्यांची कोंडी

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातत्याने नवनविन संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी अवकाळी तर कधी दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांसमोर सातत्याने संकट उभी ठाकलेली असतात. अशातच आता पीककर्जाची वसुली करण्यासाठी बँकेतून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील अणदुर, कळंबसह हजारो शेतकऱ्यांची बॅंक खाती बॅंकेकडुन होल्ड करुन शेतकऱ्यांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन मशागत व फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभ ठाकलं आहेत.

खरीप व रब्बी हंगाम घेताना शेतकरी (Farmer) बँकांकडून कर्ज घेत असतो. शासनाकडून देखील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. त्यानुसार शेतकरी कर्ज काढून शेती करत असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. तर शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने डोक्यावर असलेले कर्ज (Crop Loan) फेडता येत नाही. दरम्यान मागील तीन वर्षापासून अतिवृष्टी, अवर्षण, नापीकी व रोगराईमुळे संकटात सापडलेला शेतकरी पिककर्ज भरु शकले नाहीत. त्यातच बॅंकेकडुन खाती होल्ड केल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. 

शेतकरी अडचणीत 

खरीप पेरणीसाठी बियाणे, खते, औषधे कोळपणीसाठी चार पैसे बचत करुन ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड केल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे बँकांनी सदरील होल्ड तातडीने काढावे, अन्यथा बॅंकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे. तर ऐन मशागतीच्या वेळी कोंडी केल्याने शेतकरी हतबल झाला असुन शासनाने तातडीने बॅंकाना आदेश देवुन ही खाती होल्ड काढावे व पिकर्ज माफ करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

Maharashtra Politics: बच्चू कडूंना 'जोर का झटका', आमदार राजकुमार पटेल शिंदे गटाच्या वाटेवर?

India vs Pakistan: आज जिंकावंच लागेल! पाकिस्तानविरूद्ध 'या' चुका करणं टीम इंडियाला पडणार महागात

Marathi News Live Updates : एसटी बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठीय्या आंदोलन

Viral Video: वाह गुरु! गणित शिकवण्याचा शिक्षकाचा अनोखा फंडा; असा जुगाड तुम्ही कधीच पाहिला नसेल

SCROLL FOR NEXT