पावसाअभावी १५ लाख हेक्टरवरील पिके संकटात 
ऍग्रो वन

पावसाअभावी १५ लाख हेक्टरवरील पिके संकटात

पाण्याचाही प्रश्न पुढच्या काही काळात गंभीर होण्याची शक्यता

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस Rain नसल्यामुळे १५ लाख हेक्टरवरील पिके संकटात आली आहेत. त्यामुळे पुन्हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना Farmerदुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकण्याची भिती वाटत आहे. पावसाअभावी सोयाबीन Soyabean, मका, कापूस Cotton ही पिकं वाळून चालली आहेत. तर पाण्याचाही प्रश्न पुढच्या काही काळात गंभीर होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा -

कारण सध्या मोठ्या प्रकल्पांमध्येही ४८.१६ टक्केच जलसाठा आहे. मराठवाड्यात सलग तीन आठवड्यांपासून पावसाचा टिपूसही पडला नसल्यानं जवळपास ८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील खरीप पीक संकटात आले आहे. सध्या हलक्या जमिनीतील आणि माळरानावरील सोयाबीन, मका, कापूस वाळून जात आहेत. पिकाची ही स्थिती असताना लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्येही केवळ ४८.१६ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पांनाही पावसाची प्रतीक्षाच आहे.

मराठवाड्यात यंदाही चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली, मात्र सध्या तरी ते दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सुरुवातीला नांदेड, परभणी,हिंगोली, जालना, लातूर या पाच जिल्ह्यांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी देखील लावली आहे. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रखडलेल्या खरीप हंगामाच्या पेरण्या शेवटच्या आठवड्यात ९८.२४ टक्क्यांवर पोहचल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT