<div class="paragraphs"><p>बीड&nbsp;पीक विमा मॉडेल संदर्भात विरोधाभास</p></div>

बीड पीक विमा मॉडेल संदर्भात विरोधाभास

 

विनोद जिरे 

ऍग्रो वन

बीड पीक विमा मॉडेल संदर्भात विरोधाभास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे 

बीड -  बीड पीक विमा मॉडेलची राज्यभर चर्चा झाली. मात्र बीड जिल्ह्यामध्ये आल्यावर दुसरे ऐकायला मिळत आहे. पीक विमा संदर्भात बीड मॉडेल मध्ये  विरोधाभास हवेत याची शहानिशा करू. शेतकऱ्यांसाठी योग्य असेल तो निर्णय घेतला जाईल. असे अजित पवार यांनी सांगितले. बीडच्या पिक विमा पॅटर्नची जोरदार चर्चा झाली म्हणून मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांना विनंती केली की तो पॅटर्न राज्यभर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार विचाराधीन असताना, कृषी अधिकारी सांगतात हा पॅटर्न चांगला आहे. कृषीमंत्री म्हणतात हा पॅटर्न चांगला आहे. मात्र याची शहानिशा केली जाईल असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

काही राज्यांनी पिक विमा पॅटर्न बंद केला आहे. यात कंपनीचा फायदा जास्त होत असल्याचे लक्षात आले आहे. म्हणून या बाबतीत विचार करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

हे देखील पहा -

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे ,पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यांच्या उपस्थितीत आज खरीप हंगाम आढावा व कोरोना संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आरोग्य यंत्रणेची कान उघाडणी करत जिल्हा प्रशासनाला कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच संभाव्य तिसरी लाट या बाबतीत देखील चर्चा करण्यात आली. आमदार निधीतून एक कोटी खर्च करण्याची परवानगी द्या याबाबत लवकरच निर्णय घेऊ. स्वतः च्या मतदार संघात खर्च करण्यास काही अडचण नाही. मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेऊ असं पवार म्हणाले. खरीप मधील बी बियाणे आणि खते मुबलक उपलब्ध करा अश्या सूचना पीक कर्जा संदर्भात बँकांना दिल्या. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती होती.

बीडच्या पीक विमा पॅटर्नची चांगली चर्चा झाली म्हणून, मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांना विनंती केली, की हा पॅटर्न पूर्ण राज्यात लागू करा. कृषीमंत्र्यांनी सांगितले, की हा पॅटर्न चांगला आहे. अधिकारीवर्गाचे देखील म्हणणे आहे, की हा पॅटर्न चांगला आहे.त्याची कमिटी करण्यात आली आहे. यंदा तो पूर्ण राज्यात लागू करणाचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने उशीर झाल्याने ते होऊ शकले नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

SCROLL FOR NEXT