पाऊस थांबत नसल्याने खरीप पीक पाण्यात. SYSTEM
ऍग्रो वन

सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल काय... रब्बीचे चित्र धूसर

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर अशा वार्ता हंगामाच्या प्रारंभी कानावर आल्या. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात घट आली. नंतर काढणीच्या वेळी पावसाने झड लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बहुतांशी उडीद शेतातच आहे. सोयाबीन आणि कपाशीचे पीकही पाण्यात आहे. समुद्रात उठणाऱ्या विविध वादळांमुळे सातत्याने पाऊस पडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.

खरिपाचे पीक निम्मेच हातात आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यात मालाचा दर्जा नसल्याने भावही मिळत नाही. आता रब्बीच्या पेरणीविषयी चिंता सतावते आहे. वाफसाच नसल्याने पेरणी झालेली नाही. सध्या रब्बीचा हंगाम सुरू झाले. ज्वारी, हरभरा किंवा गव्हाचा पेरा केला जातो. परंतु आणखी कोणत्याच शेतकऱ्याने चाड्यावर मूठ धरलेली नाही. नगर जिल्हा रब्बीचा म्हणून ओळखला जातो. परंतु वाफसाच होत नसल्याने परिस्थिती गंभीर आहे.

सातत्याने पाऊस होत असल्याने रब्बीपूर्व मशागत करता आलेली नाही. उत्पादित मालाचा दर्जाही ढासळला. काढणीला आलेले सोयाबीन पावसामुळे काढता आले नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीकडे शासनकर्त्यांनी डोळेझाक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

या वर्षी जिल्ह्यात खरीप पिकांत मोठा बदल झाला. कापसाची लागवड व तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. शेतकऱ्यांनी उडीद व सोयाबीनला पसंती दिली.

खरीपात उडीद सोयाबीन जोमदार वाढले. मात्र शेंगा कमी लागल्या अन् पीक काडावर गेले. काढणी सुरू होणार तोच पावसाने धुमचक्री सुरू केली. ती काही बंद होईना. तरीही उघडिपीचा आधार घेत शेतकऱ्यांना उडीद काढला, मळणीही केली. डागी मालाचा शिक्का माथी पडल्याने बाजार भाव कमी झाला. बहुतांश शेतकऱ्यांना पावसामुळे सोयाबीनची काढणी करता आली नाही. सोयाबीनला जागेवर कर फुटले आहेत.

बहुतांशी वेळा शेतकऱ्यांना पाऊस नसल्याने आकाशाकडे डोळे लावून बसावे लागते. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, यासारखी गाणी बच्चे कंपनी गुणगुणतात. परंतु आता शेतकऱ्यांना सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल काय...असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

Vidhan Sabha Election Result : कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; मतदारसंघातून अमल महाडिकांचा विजय निश्चित

SCROLL FOR NEXT