चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर 'लष्करी अळी'चं संकट Saam Tv
ऍग्रो वन

चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर 'लष्करी अळी'चं संकट

चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) उभ्या शेतपिकांवर लष्करी अळी, उंट अळी, किटक आणि ईतर बऱ्याच रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) उभ्या शेतपिकांवर लष्करी अळी, उंट अळी, किटक आणि ईतर बऱ्याच रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. भद्रावती तालुक्यात याचा सर्वाधिक प्रभाव दिसतो आहे. १० वर्षापूर्वी भद्रावती आणि वरोरा तालुक्यात लष्करी अळीने थैमान घातले होते. या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे सोयाबिनचे उभे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले होते. त्याची पुनरावृत्ती यंदाही दिसून येत आहे.

भद्रावती तालुक्यातील वाघेडा, जेना, पिल, धानोली, धामणी, नंदोरी आणि टाकळी या गावातील हजारो हेक्टर सोयाबीनच्या पिकांवर (Soyabean Crop) ही लष्करी अळी आढळून आली आहे. या अळीचा प्रादुर्भाव भयानक आहे. एका रात्रीतून शेकडो हेक्टर उभे पीक ही अळी नष्ट करते. सध्या पानांची चाळणी झाली असून, शेंगाही गळून पडल्या आहेत. त्यामुळे या अळीचा 10 वर्षांपूर्वीचा प्रादुर्भाव पाहता शेतकरी वर्गात चिंतेचे सावट निर्माण झाले आहेत.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाची अनियमीतता आहे. पश्चिंम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर मराठवाडा, विर्दभात आता कुठे पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवस प्रतिक्षेत असलेले शेतकरी पावसाने सुखावले आहेत. परंतू अनेक ठिकणी पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी गेले आहे. काल पावसाने कन्नड घाटात दरड कोसळलेली पाहायला मिळाली. पावसाची अनियमितता आणि पिकांवरील रोगांचे संकट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT