खासदार हेमंत पाटील यांना स्वाभीमानीचे निवेदन 
ऍग्रो वन

केळी उत्पादकांची खरेदीदार, मध्यस्थांकडून लूट; स्वाभिमानीचे हेमंत पाटील यांना निवेदन

व्यापारी केळीच्या चालू भावातून ६० रुपये प्रति क्विंटल कमिशन घेत आहेत. प्रति क्विंटल १२ किलोपर्यंत दांडा वजन कपात करुन घेतले जात आहेत. तोड आणि वाहतुकीचे दर मनमानी पद्धतीने आकारले जातात.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नांदेड : अर्धापूर शहरात केळी खरेदीदार तसेच मध्यस्थांकडून केळी उत्पादक शेतकर्‍यांची विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. पाच) खासदार हेमंत पाटील यांची भेट घेवून यात लक्ष्य घालण्याची मागणी केली.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड तालुक्यासह हिंगोली जिल्ह्याचा मोठा भाग चांगल्या प्रतीच्या केळी उत्पादनाकरिता आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. अर्धापूर शहरात केळी खरेदीदार आणि दलाल यांची दुकाने असल्याने येथे केळीची मोठी आर्थिक उलाढाल होते. सध्या कोरोनामुळे दर पडले आहेत. यामुळे शेतकर्‍यांना फटका बसला आहे. शेतकरी संकटात असतांना केळीचे दलाल आणि व्यापार्‍यांनी यांचा गैरफायदा घेत विविध प्रकारे शेतकर्‍यांची लूट सुरु केली आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर लहान बालकांच्या बाधित होण्याचा धोका लक्षात घेऊन पेडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आला

व्यापारी केळीच्या चालू भावातून ६० रुपये प्रति क्विंटल कमिशन घेत आहेत. प्रति क्विंटल १२ किलोपर्यंत दांडा वजन कपात करुन घेतले जात आहेत. तोड आणि वाहतुकीचे दर मनमानी पद्धतीने आकारले जातात. गाडी भरतांना लागणारी पत्ती न मोजताच भरली जाते आणि त्याचे ज्यादा वजन दाखवले जाते. इलेक्ट्रॉनिक काट्यात रिमोटने फेरफार करुन अंदाजे १० टक्क्यांपर्यंत वजन चोरले जाते. विकलेल्या मालाची पक्की पावती न देता कच्या पावत्या दिल्या जातात. अनेक केळीचे व्यापारी बाहेर राज्यातुन केळी खरेदीसाठी येतात त्यांची शासन दरबारी कुठेच नोंद नसते. या गोष्टींचा गैरफायदा घेत अनेक व्यापार्‍यांनी पोबारा करून शेतकर्‍यांचे पैसे बुडविले आहेत.

या सर्व गोष्टींना एखाद्या शेतकर्‍याने विरोध केल्यास सर्व व्यापारी त्या शेतकर्‍यावर अघोषित बहिष्कार टाकून त्याचा माल उचलत नाहीत, अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे बागायती शेतकरी चांगले उत्पादन निघुनसुद्धा आर्थिक लुटीमध्ये सापडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जिल्हा सहकार निबंधक यांचे या लुटीकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्या कारणाने शेतकर्‍यांना कुणीही वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बैठक घेण्याची मागणी

केळी लूटीबाबीची तातडीने दखल घेऊन केळी व्यापारी, शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी, आमदार, खासदार यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढावा. आणि केळी उत्पादकांना लुटीतून मुक्त करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी स्वाभिमानीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने, नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पराग अडकीने उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT