Manasvi Choudhary
पावसाळा सुरू होताच बाजारात कवळ्याची भाजी विकायला येते. पावसाळ्यात कवळ्याच्या भाजीला विशेष मागणी असते.
चिंचेसारखी दिसणारी कोवळ्याची भाजी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.
कोवळ्याची भाजी बनवण्यासाठी कवळा भाजी, कांदा, लसूण, हिरवी मिरची, हळद, तेल, मीठ, ओलं खोबरे हे साहित्य घ्या.
भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी कवळा भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर भाजी बारीक चिरून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण, हिरवी मिरची परतून घ्या. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
या संपूर्ण मिश्रणात हळद आणि चिरलेला कवळा भाजी मिक्स करा. भाजी वाफेवर शिजवून घ्या.
भाजी शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि किसलेले ओलं खोबरे मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी गरमा गरम कवळा भाजी तयार होईल.