Farmers buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Unique Experiment Farmers: शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग; कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बांधावरून मिठाची धुरी

Artificial Rain Process In Maharashtra: शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग; कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बांधावरून मिठाची धुरी

संजय जाधव

बुलढाणा : ढगाला लागली कळ आणि पाणी थेंब थेंब गळ.. हे गाणं आपण एकल असेल..८० च्या दशकातील या सुपरहिट गाण्याचा काहीसा प्रत्यय सध्या बघायला मिळत आहे. ढगाला कळ लागल्याशिवाय पाऊस बरसत नाही आणि ही कळ देण्याचं काम (Buldhana) बुलढाण्यातील भाबडे शेतकरी (Farmer) करताना सध्या दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास एक ते सव्वा महिना उलटला. मात्र बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांनी एक नवीन युक्ती शोधून ढगांना कळ देऊन पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. (Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव धुर करून कृत्रिम पावसासाठी प्रयोग करत आहेत. या धुरात काय टाकत आहेत? तर मंडळी हे आदिवासी शेतकरी बांधव शास्त्रीय प्रयोग करत आहेत. याला म्हणतात ‘धूळपेरणी’ अर्थात ‘क्लाऊड सेडिंग’. धूळ पेरणी म्हणजे आकाशात जमलेल्या ढगांना मिठाची धुरी. मिठाची धुरी दिल्याने पाऊस पडतो असा काहीसा हा समज आहे. मात्र याला ही शास्त्रीय कारण आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगात हेच तत्‍त्व पाळले जात असते.

असा पाडला जातो कृत्रिम पाऊस

कृत्रिम पावसाच्या प्रयोगात आकाशातील ढगांवर मिठाचे पाणी अर्थात सोडियम क्लोराईड व सिल्व्हर आयोडाईड याच मिश्रण असलेलं पाणी विमानातून फवारतात. मिठाच्या कणांमध्ये पाणी शोषून घेण्याचे गुणधर्म असल्याने ढगातील पाणी मिठाचे कण शोषून घेतात व पाण्याचा थेंब तयार होऊन पाऊस (Rain) पडतो. मात्र त्यासाठी मिठाच्या पाण्याची फवारणी ढगांवर करावी लागते. शक्यतो विमानातून ढगांवर जाऊन ती करावी लागते.

भाबळी आशा

शेतकरी मिठाची धुरी देऊन ढगांना कळ देऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करत आहेत. जाळात मीठ टाकल्याने त्याचा धूर काही अंशी का होईना ढगांपर्यंत पोहचून पाऊस पडेल; अशी या शेतकऱ्यांची आशा आहे. म्हणून ते ढगांना मिठाची धुरी देऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करत आहेत. खरं तर बांधावरून मिठाची धुरी देऊन ती किती ढगांपर्यंत पोहचून पाऊस पडेल, यात शंका आहे. मात्र मान्सून संपूर्ण राज्यात सक्रिय होऊनही बुलढाण्यात या भागात अद्याप पाऊस नसल्याने व जिल्ह्यातील ९० टक्‍के पेरण्या अद्याप खोळंबल्याने हे शेतकरी असा प्रयोग करत असल्याचं जाणकार सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

SCROLL FOR NEXT