Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana Khamgaon News : कापूस, सोयाबीन प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; खामगावजवळ केला रास्ता रोको

Buldhana News : यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगला राहिला नाही. पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. यातच आता शेतकऱ्याचा घरात कापूस व सोयाबीन आल्यानंतर त्यांच्या दरात घसरण झाली आहे

संजय जाधव

बुलढाणा : कापूस आणि सोयाबीनला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज खामगावजवळ राष्ट्रीय महामार्ग सहावार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगला राहिला नाही. पावसामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. यातच आता शेतकऱ्याचा घरात कापूस व सोयाबीन आल्यानंतर त्यांच्या दरात घसरण झाली आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच कापूस, सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासनाने आधारभूत किमतीचे केंद्र कमी सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस उत्पादन झाल्यावरही शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

शेतकऱ्यांना कापसाला व सोयाबीनला आधारभूत भाव मिळाला पाहिजे. कापूस आणि सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी; या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह खामगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

वाहतूक खोळंबली 

शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. साधारण एक तास रास्ता रोको आंदोलन झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

Maharashtra Politics : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार की जाणार? साडेसाती टाळण्यासाठी कृषीमंत्री शनिचरणी?

Maharashtra Live News Update: पावसाळ्यात बीडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात "होडी चलाव" आंदोलन

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

SCROLL FOR NEXT