Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : २३५ कोटी रुपयाचा पिक विमा मोबदला बाकी; पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांची कृषी कार्यालयात धडक

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असताना देखील चुकीचे कारण दाखवून शेतकऱ्यांना अपात्र ठरविले

संजय जाधव

बुलढाणा : शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजनेंतर्गत विमा काढलेला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या पिकविम्यापासून शेतकरी वंचित आहेत. यामुळे वंचित असलेल्या पात्र- अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा देण्यात यावा; या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेते संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली.

बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असताना देखील चुकीचे कारण दाखवून शेतकऱ्यांना अपात्र ठरविले. साधारण अपात्र केलेल्या १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा (Crop Insurance) मोबदला दिलेला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. त्या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. 

पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३५ कोटी ५५ लक्ष रुपयांची रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. यामुळे ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू; असे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा रक्कम जमा करावी. अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्याकडे केली.

आचारसंहितेमुळे आम्ही शांत होतो, आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वंचित पात्र- अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करा. अन्यथा आठ दिवसांनंतर पिकविम्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

SCROLL FOR NEXT