Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News : भुईमूग व कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; अवकाळी आणि सततच्या ढगाळ वातावरणाचा फटका

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन- चार वर्षापासून सातत्याने अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त झालेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या चक्रव्यूहात चांगलाच अडकला आहे

संजय जाधव

बुलढाणा : मागील पंधरा दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस. यामुळे प्रामुख्याने कांदा व भुईमूग उत्पादक शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात गेल्या तीन- चार वर्षापासून सातत्याने अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त झालेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या चक्रव्यूहात चांगलाच अडकला आहे. खरिपातील पीक हातातून गेल्यानंतर रब्बी पिकांवर शेतकऱ्यांना मोठी आशा होती. मात्र याही हंगामात शेतकरी दुहेरी संकटात सापडला. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कांदा (Onion) व भुईमुग पिकाच्या उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. 

खर्च निघणेही अशक्य 

दुसरीकडे पिकाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर (farmer) अस्मानी सह सुलतानी संकट घोंगावत आहे. रब्बी हंगामातील पिकामध्ये देखील होणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हतबल होताना दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोड ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT