Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News: मुद्दल, व्‍याज देवूनही सावकाराचा जाच; जमिन परत देत नसल्‍याने बळीराजाने संपवली जीवनयात्रा

मुद्दल, व्‍याज देवूनही सावकाराचा जाच; जमिन परत देत नसल्‍याने बळीराजाने संपविली जिवनयात्रा

Rajesh Sonwane

बुलढाणा : गावातील अवैध सावकाराकडून ५० हजार रुपये व्याजाने घेऊन व्याजासह रक्कमेची परतफेड केली. तरी देखील वारंवार तकादा लावूनही सावकार (Maney Leander) आपली २० गुंठे जमीन परत करत नसल्याने आलेल्या नैराश्येतून बळीराजाने (farmer) शेतामध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील शेळगांव अटोळ या गावामध्ये सदरची घटना घडली. या घटनेमळे या अवैध सावकाराच्या विरोधात गावामध्ये संतप्तं वातावरण निर्माण झााले आहे. (Letest Marathi News)

चिखली तालुक्यातील शेळगांव आटोळ या गावामध्ये रहीवाशी असलेले शेतकरी सुधाकर श्रीराम मिसाळ यांनी अनिल दौलत तिडके या अवैध सावकाराकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात सावकाराने सुधाकर मिसाळ यांच्याकडील २० गुंठे जमीन आपली पत्नी कल्पना अनिल तिडके यांच्या नावाने खरेदी करुन घेतली होती. सुधाकर मिसाळ यांनी महिनाभराच्या कालावधीतच मुद्दल व व्याजाची रक्कम मिळून ६० हजार रुपये अनिल तिडके यांना परत केले. त्यानंतर आपली शेतजमीन परत मागितली.

सावकारावर गुन्‍हा दाखल

तिडके यांनी टोलवाटोलवी करत शेतजमीन परत केली नाही. त्यामुळे नैराश्य येऊन या अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. शेवविच्‍छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णाल्यात मृतदेह आणला. त्यावेळी मिसाळ कुटुंबांनी जोपर्यंत अवैध सावकारा विरोधात गुन्हा दाखल होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी तातडीने त्या अवैध सावकारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT