बुलढाणा : शेतात नांगरटी करण्यास गेलेल्या एका ३२ वर्षीय शेतकऱ्याचा (Farmer) विजेचा धक्का लागल्याने जागीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (१६ जून) दुपारी खामगाव (Khamgaon) तालुक्यातील पिंप्राळा येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्याला संतप्त जमावाने मारहाण केल्याची माहिती आहे.
खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील ३२ वर्षीय शेतकरी श्रीकांत पटोकार हे आज (१६ जून) पहाटे नांगरटी करण्यासाठी गेले. नांगरटी करताना शेतात पडलेल्या विद्युत खांबावरील तारेला स्पर्श झाल्याने पटोकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कंपनीचा (Mahavitaran) एक कर्मचारी तेथे पोहोचला. त्यावेळी या कर्मचार्याला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही संतप्त ग्रामस्थांनी या कर्मचार्याला मारहाण केल्याचेही माहिती आहे.
महावितरणकडे केली होती तक्रार
गत तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यात पिंप्राळा परिसरात काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले होते. या खांबावरील विद्युत तारेत विज प्रवाह सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीकडे केली होती. मात्र, तरीही वीज तारांची दुरूस्ती तसेच प्रवाह बंद न करण्यात आल्यानेच युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.