Buldhana Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Buldhana Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान; खासदार प्रतापराव जाधव यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी

Buldhana News : शेतातील कापूस, तूर, गहू, हरभरा आणि फळबागांचं मोठे नुकसान झाले. सिदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी उभारलेले शेडनेट तुटून पडले आहेत

Rajesh Sonwane

संजय जाधव
बुलढाणा
: बुलडाणा जिल्ह्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) रात्रीपासून मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाट जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी (Buldhana) पावसाने हजेरी लावली.  तर काही भागात गारांचा पाऊस झाला असून शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय शेडनेटचे देखील मोठे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी केंद्रीय माहिती संवाद आणि तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व लोणार तालुक्यात रात्री विजांच्या कडकडासह गारांचा पाऊस (Rain) झाला. त्यामुळे शेतातील कापूस, तूर, गहू, हरभरा आणि फळबागांचं मोठे नुकसान झाले. सिदखेडराजा, देऊळगाव राजा आणि लोणार या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी उभारलेले शेडनेट तुटून पडले आहेत. या भागामधील शेतांमध्ये पाणी तुंबून राहिल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतजमीनही खरडून गेली आहे. यात शेतकऱ्यांचे (Farmer) प्रचंड नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंचनामे करण्याचे आदेश 
दरम्यान आज (२७ नोव्हेंबर) सकाळीच केंद्रीय माहिती संवाद व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्याशी चर्चा करून यासंदर्भात तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT