Ravikant Tupkar News: सरकार हम से डरती है... पुलिस काे आगे करते है... शर्वरी तुपकरांचा पाेलीस ठाण्यासमाेर ठिय्या, राजू शेट्टींचाही इशारा

रविकांत तुपकर यांना पाेलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात शेतक-यांकडून ठिकठिकाणी आंदाेलनास प्रारंभ झाला आहे.
sharvari tupkar andolan after police took charge of ravikant in buldhana
sharvari tupkar andolan after police took charge of ravikant in buldhanasaam tv

Buldhana News :

कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा यासाठी 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ इच्छिणा-या शेतकरी नेते रविकांत तुपकरांना (ravikant tupkar latest marathi news) पाेलीसांना आज (शनिवार) दुपारच्या सुमारास बुलडाण्यात ताब्यात घेतले. तुपकरांना पाेलीसांनी ताब्यात घेतल्याची बातमी जिल्ह्यात वा-या सारख पसरली. त्यानंतर तुपकर यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी निषेध नाेंदवण्यास प्रारंभ केले आहे. (Maharashtra News)

देऊळगावमही येथे शेतकरी गणेश शिंगणे यांनी टॉवरवर चढून रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध नाेंदवला. यावेळी शेतक-याने जोरदार घोषणाबाजी केली. खामगाव तालुक्यात देखील ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. शेतक-यांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोकाे केला.

sharvari tupkar andolan after police took charge of ravikant in buldhana
Baby Born With 24 Fingers : तब्बल 24 बोटांचे बाळ जन्मले; दुर्मिळ घटनेची धाराशिवात चर्चा (पाहा व्हिडिओ)

बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर, भामखेड तसेच पेठ येथे देखील तुपकर यांच्या समर्थकांनी टायर पेटवून पाेलीसांच्या कृतीचे निषेध केले. दरम्यान रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी यांनी पाेलीसांनी बेकायदेशीरपणे रविकांत भाऊ यांना अटक केल्याच्या आरोप केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या म्हणाल्या कुठलाही गुन्हा केलेले नसताना तुपकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तुपकर यांची सुटका हाेईपर्यंत पाेलीस ठाण्यासमाेर ठिय्या आंदोलनास प्रारंभ करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यासमोर फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

राजू शेट्टी भडकले

साेयाबीन उत्पादक शेतक-यांचा आवाज दपडण्यासाठी सरकराने कितीही दडपशाही केली तरी ही चळवळ थांबणार नाही. रविकांत तुपकर यांना अटक हाेऊ दे अथवा आणखी काही. जाेपर्यंत शेतक-यांना न्याय मिळत नाही ताेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

sharvari tupkar andolan after police took charge of ravikant in buldhana
Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com