
Buldhana News : शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवेसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. साथ सोडल्यानंतर या आमदार आणि खासदार यांच्याकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील भाषणातून बोलताना १०० कोटी मातोश्री ओके, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली होती.
सचिन वाझे मार्फत मुंबईतील बार, अवैध धंध्यावाल्याकडून जमा केले जात होते. सर्व १०० खोके मातोश्रीवर जात होते हे खरं होतं म्हणून वाझे तुरुंगात आहे, असेही खासदार जाधव बोलले होते. या वक्तव्यावरून खासदार जाधव यांनी युटर्न घेतला आहे. तसेच आमच्या संपर्कात शिवसेनेचे उर्वरित खासदारांपैकी अनेक खासदार आणि उरलेल्या १५ आमदारांपैकी काही आमदार आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. (Maharashtra Political News In Marathi )
बुलढाण्याच्या मेहेकरमध्ये सत्तांतरानंतर पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणातून बोलताना १०० कोटी मातोश्री ओके, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.
खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, 'तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराचे ७५ टक्के शिवसैनिक आणि संघटना लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि तेव्हा सातत्याने आमच्या आमदार लोकांवर आरोप केले जात होते. 'पन्नास खोके एकदम ओके' असे आरोप आमदारांवर केले. मात्र, मोठ्या प्रमाणावर संघटनेचे लोकप्रतिनिधी दूर होत आहेत ते आत्मपरीक्षण करण्याऐवजी डोके फोडू याला त्याला मारा, अशी भूमिका घेण्यात आली. सचिन वाझेचं समर्थन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केले होते'.
'अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे देखील तुरुंगात होते, त्यांचे देखील समर्थन करण्यात आलं होतं. आरोप तर कुणावरही करण्यात येतात. काही उद्धव ठाकरे यांचे नाव घेतलेलं नाही, असं म्हणत आज शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या वाझेकडून मातोश्रीवर शंभर खोके पोचत होते या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे .
'आमच्या संपर्कात उर्वरित खासदारांपैकी अनेक खासदार आणि उरलेल्या १५ आमदारांपैकी आमदार आहेत, असा सूतोवाच खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तर तीन ते चार खासदार आमच्याकडे येऊ शकतात. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी आम्ही सर्व पुरावे सादर केले आहे. धनुष्य बाण आमच्याकडे येईल. त्यामुळे शिवसेनेतील सर्व प्रतिनिधी आमच्याकडे येतील, असे खासदर प्रतापराव जाधव म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.