Cotton Price
Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: ८० टक्के जिनिंग बंद; भाव नसल्‍याने संकट, शेतकऱ्याच्या घरात कापूस

संजय जाधव

बुलढाणा : यंदा राज्यात कापूस उत्पादन चांगल्याप्रकारे झाले आहे. मात्र सध्या कापसाला भाव मिळत नसल्याने (Farmer) शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत घरात साठवून ठेवला आहे. यामुळे मात्र राज्यातील कापसावर (Cotton) प्रक्रिया करणारे जवळपास ८० टक्‍के जिनिंग बंदच आहेत. तर काही २० टक्‍के जिनिंग सुरू करण्यात आले होते; तेही आता कापसाच्या अभावी बंद पडलेत. (Live Marathi News)

राज्यात सुमारे ५०० च्यावर जिनिंग व त्यात काम करणारे सुमारे ३ लाख मजूर आहेत. ज्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. पश्चिम विदर्भातील कापूस हा उच्च दर्जाचा असून त्याचा लांब धागा निघत असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जसे चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया या सारख्या देशांमध्ये मोठी मागणी असते.

भाव नसल्‍याने संकट

यंदा कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग कापसा अभावी बंदच आहेत. त्यामुळे राज्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुणावत असली, तरी शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह जिनिंग चालकही संकटात सापडले आहेत व यावर अवलंबून असलेले तीन लाख कामगार देखील संकटात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhika Kheda Resign: श्रीराम मंदिराचे दर्शन घेतल्याने पक्षातून विरोध.. काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा!

Heat Wave : उष्णतेची लाट; जळगाव, वर्ध्यात तापमान पोहचले ४४ अंशांवर

Raigad Lok Sabha: मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा

Breakfast Recipe: ज्वारीच्या पीठापासून बनवा झटपट पौष्टीक नाश्ता

Actor Bernard Hill Dies : 'टायटॅनिक' चित्रपटातला कॅप्टन काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT