Jamner News: बंजारा समाज आक्रमक; जमिनीचा प्रश्‍न तात्‍काळ मार्गी लावा

बंजारा समाज आक्रमक; जमिनीचा प्रश्‍न तात्‍काळ मार्गी लावा
Jamner News
Jamner NewsSaam tv

जामनेर (जळगाव) : ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये जमिनीच्या प्रश्नाबाबत व ताड्या- पाड्यावरील विकास कामांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बंजारा समाज आक्रमक झाला. बंजारा ब्रिगेडच्यावतीने (Jamner) जामनेरमध्ये धडक मोर्चा काढून बंजारा समाजाच्या जमिनीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. (Letest Marathi News)

Jamner News
Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा अधिकाऱ्यांवर दबाव; राष्ट्रवादी, भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील जामनेरमध्ये बंजारा समाजाच्या जमिनीच्या प्रश्नाबाबत व ताड्या पाड्यावरील विकास कामांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बंजारा समाज आक्रमक झाला. बंजारा ब्रिगेडच्या वतीने जामनेरमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या धडक मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा समाज बांधव रस्तावर उतरले असून आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा बंजारा ब्रिगेडच्यावतीने मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

तर खुर्चीवरून उतरविण्याचीही ताकद

बंजारा समाजाच्या भरोशावर अनेक राजकीय नेते निवडून येत असून निवडून आल्यावर तेच नेते आमच्या मुलभूत सोयी सुविधाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमच्यात त्यांना खुर्चीवर बसविण्याची ताकद आहे. तशीच खुर्चीवरून खाली उतरविण्याची पण ताकद आहे; असा चिमटा काढून संपूर्ण समाज एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com