Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

NAFED Center : शासकीय खरेदी केंद्रावर पुन्हा बारदान तुटवडा; सोयाबीनचे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद

Buldhana Nashik News : बारदाना नसल्याने खरेदी केंद्र बंद पडले असून शेतकरी सुद्धा अडकले आहेत. शासनाने तत्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे

Rajesh Sonwane

संजय जाधव/ अजय सोनवणे 
बुलढाणा/ नाशिक
: मागील महिन्यात बारदान अभावी सोयाबीन खरेदी थांबली होती. परिणामी सोयाबीन खरेदीचे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद होती. हीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली असून मागील दोन दिवसांपासून केंद्रावरील बारदान संपल्याने खरेदी केंद्र पुन्हा बंद झाली आहे. यामुळे सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यात नाफेड अंतर्गत जवळपास ५७ खरेदी केंद्राला मंजुरता देण्यात आली असून ८५ हजाराचेवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र बारदान नसल्याने जवळपास ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांचे खरेदी झाली. मात्र बारदाना नसल्याने खरेदी केंद्र बंद पडले असून शेतकरी सुद्धा अडकले आहेत. शासनाने तत्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. 

बाजारात कमी दराने विक्री 
बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी मागील दोन दिवसांपासून बारदाना अभावी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन गाड्यांच्या रांगा लागल्या असून शेतकऱ्यांना केंद्रावरच रात्री मुक्कामी राहावे लागत आहे. तर काही शेतकरी आपला माल खरेदी केंद्रावर न नेता त्याला बाजारात कमी भावात विकत आहेत. परिणामी शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

नाशिक जिल्ह्यातही सोयाबीन खरेदी बंद
मनमाड (नाशिक)
: नाशिक जिल्ह्यात येवलासह ५ ठिकाणी शासकीय हमी भावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या खरेदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी आतापर्यंत येवल्यात सर्वाधिक ९११ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली. मात्र अद्याप काही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी असताना शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावरील बारदान संपल्याने येवला येथील खरेदी बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ निम्याच शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाल्याने बारदाना अभावी खरेदी रखडल्याने लवकरात लवकर ते उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT