Koyna Dam : कोयना, चांदोली धरणातून सिंचनासाठी यंदा ५४ टीएमसी पाणी; चार महिनेच चालणार आवर्तन

Sangli News : धरणांमधील पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाटचाऱ्यांद्वारे पाणी सोडण्यात येत असते. प्रामुख्याने रब्बीच्या हंगामात धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असते.
Koyna Dam
Koyna DamSaam tv
Published On

सांगली : कोयना आणि चांदोली धरणातून यंदा सिंचनासाठी ५४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. सिंचनासाठी उपलब्ध साठा १०० टक्के उचलता येणार नाही. मात्र यंदा केवळ चारच महिने आवर्तन चालणार आहे. परिणामी पुरून उरेल इतके पाणी हाताशी आहे. केवळ एप्रिल मे मध्ये आवर्तनाच्या फेऱ्यामधील ताण टाळण्याचे आव्हान पाटबंधारे विभागाला पेलावे लागणार आहे.

धरणांमधील पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाटचाऱ्यांद्वारे पाणी सोडण्यात येत असते. प्रामुख्याने रब्बीच्या हंगामात धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत असते. त्यानुसार काही भागांमध्ये आवर्तन सोडण्यात आले आहे. आता कोयना व चांदोली धरणातून देखील सिंचनासाठी आवर्तन सोडले जाणार आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा धरणात चांगला पाणीसाठा आहे. यामुळे यंदा ५४ टीएमसी पाणी सिंचनासाठी दिले जाणार आहे. 

Koyna Dam
Hingoli : स्वतःच केला हल्ल्याचा बनाव; निवडणूक काळातील धक्कादायक प्रकार आला समोर, उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना अटक

चारच महिने सुटणार आवर्तन 
सांगलीच्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना मधून शेतकऱ्यांनी अद्याप पाणी मागणी नोंदवली नाही. पाटबंधारे विभागाने पंप आणि कालव्यांच्या तपासणीसाठी आवर्तन  चालवले आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आवर्तन नियमित सुरू होतील; अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे चारच महिने यंदा आवर्तन चालणार आहे. यानंतर मात्र शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकणार नाही. 

Koyna Dam
Pratap Sarnaik : बसच्या धडकेत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखाची मदत; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

मागणी केल्यास कर्नाटकमध्येही पाणी  

तसेच चांदोली धरणातून ११.५४ तर कोयना धरणातून ४२.७० टीएमसी पाणीसाठा सिंचनासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. यंदा तो पूर्ण क्षमतेने वापरता येणार आहे. मात्र वास्तवात पाणी शिल्लक राहील अशी परिस्थिती आहे. परिणामी कर्नाटक सरकारने एप्रिलमध्ये मागणी केल्यास यंदा महाराष्ट्रातून पाणी उपलब्ध करून दिले जाऊ शकते अशी स्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com