Pratap Sarnaik : बसच्या धडकेत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखाची मदत; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

Mira Bhayander News : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पाच तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना बीड- परळी रस्त्यावर घडली होती. या अपघातात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSaam tv
Published On

महेंद्र वानखेडे 

मिरा भाईंदर : पोलिस भरतीचा सराव करताना एसटी बसच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. या ३ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लक्ष रुपये आर्थिक मदत एसटी महामंडळाच्या वतीने देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी यांनी आज केली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पाच तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना बीड- परळी रस्त्यावर घडली होती. या अपघातात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकार किंवा एसटी महामंडळाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्याची मागणी ग्रामस्थ व बीड विधानसभा मतदारसंघाचा आमदार यांनी केली होती. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

Pratap Sarnaik
Fraud Case : शेअर मार्केटच्या नावाने अनेकांना लाखोंचा गंडा; तीनजण पोलिसांच्या ताब्यात

कुटुंबियांशी साधला संवाद 

दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी फोनद्वारे संपर्क साधला. यावेळी स्थानी आमदार देखील उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या या ३ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लक्ष रुपये आर्थिक मदत देण्याचे घोषित केले आहे. तसेच आणखी काही मदत करता येईल का? याबाबत देखील आश्वस्त केले. 

Pratap Sarnaik
Hingoli : स्वतःच केला हल्ल्याचा बनाव; निवडणूक काळातील धक्कादायक प्रकार आला समोर, उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना अटक


राज्यात मागील काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक पवित्रा घेतला असून कामाच्या निमित्ताने हे घुसखोरी करत आहेत. कामाच्या ठिकाणी ठेकेदार कोणतीही चौकशी न करता त्यांना कामावर घेत असतात. यामुळे आता ज्यांना कामावर घेणार त्यांनी पूर्ण चोकशी करूनच घेण्यात यावे याबाबची मुख्यमंत्र्यांमध्ये मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com