बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर 'खोड अळीचं' संकट संजय जाधव
ऍग्रो वन

बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर 'खोड अळीचं' संकट

अळीसाठी पीक विम्याचे कवच देण्याची मागणी...

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: जिल्ह्यातील घाटावरील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतले जाते. पावसाअभावी कशीबशी उगवलेली सोयाबीनवर आता नवीन संकट ओढवले आहे. सोयाबीन या पिक आता कीटक नाशकांनी ग्रासले आहे, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

जुलै महिन्यात मोजक्या ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांन पुढे पाऊस नसल्यामुळे संकट उभे राहिलं. ज्या शेतकऱ्यांचं पीक कसंबस उगवलं तर त्या पिकावर आता खोड पोखरणारी अळी, चक्रभुंगा या अळीने आक्रमण केले आहे.

दुरून हिरवेगार दिसणार सोयाबीनचे हे शेत मात्र किड, खोड अळीने पोखरून निघतयं. बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कपाशी हे पीक घेतल्या जातं, खोड पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकऱ्यांपुढे उगवलेल पीक जगवण्याचे संकट उभ ठाकलय, तसचं शेतकऱ्यांना सोयाबीनला खोड पोखरणाऱ्या अळी पासुन पीक विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT