Bhandara News Saam tv
ऍग्रो वन

Bhandara News : ऊसाच्या पैशासाठी शेतकऱ्यांची कारखान्यावर धडक; कारखान्यासमोर घोषणाबाजी

Bhandara News : धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात काही भागात उसाचेही उत्पादन घेतले जाते. तुमसर तालुक्यातील देव्हारा येथे मानस साखर कारखाना आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : उसाची कापणी केल्यानंतर जवळच्या साखर कारखान्यावर उसाची विक्री केली. तसेच १५ दिवसात ऊस खरेदीची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कारखान्यावर धडक देत उसाचे पैसे मिळावे अशी मागणी केली.  

धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या (Bhandara) भंडारा जिल्ह्यात काही भागात उसाचेही उत्पादन घेतले जाते. तुमसर तालुक्यातील देव्हारा येथे मानस साखर कारखाना आहे. या परिसरातील आणि जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात उसाची तोडणी करून ते कारखान्याला दिले. यावेळी कारखाना प्रशासनान (Farmer) शेतकऱ्यांसोबत करारनामा करताना पंधरा दिवसात उसाचा आर्थिक मोबदला देण्याच वचन दिलं होतं. 

दरम्यान चार महिन्याचा कालावधी लोटला गेल्यानंतर देखील शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक मोबदल्यासाठी (Sugar Factory) कारखाना प्रशासनाकडे अनेकदा फेऱ्या माराव्या लागल्या. तरीदेखील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर आज संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी मानस कारखान्यावर धडक मोर्चा नेला. यावेळी कारखान्याचे प्रवेशद्वारावर प्रचंड घोषणाबाजी करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

SCROLL FOR NEXT