Bhandara News Saam tv
ऍग्रो वन

Bhandara News : विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्यांसोबत घडले दुर्दैवी; विषारी वायूमुळे गुदमरून झाला मृत्यू

Bhandara News : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पीडित शेतकऱ्याला विहिरीत पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले

Rajesh Sonwane

भंडारा : पिकांना सिंचनासाठी शेतात विहीर केली आहे. या विहिरीत लावलेला विद्युत मोटार पंप बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या परसोडी नाग शेत शिवारात घडली असून १८ तासांनंतर शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील परसोडी नाग येथील रामचंद्र टिकाराम बावनकुळे (वय ५७) असे घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी विहीर बांधून आपल्या शेतीच्या पिकांना सिंचनासाठी विद्युत मोटर पंप लावला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पीडित शेतकऱ्याला (Farmer) विहिरीत पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले. या स्थितीत विहिरीत बसवलेला विद्युत मोटार पंप पाण्यात बुडून खराब होण्याची भीती असल्याने पीडित शेतकरी घटनेच्या दिवशी विहिरीत लावलेला मोटार पंप काढण्यासाठी विहिरीत उतरले होते.  

शेतकरी रामचंद्र बावनकुळे होते. यावेळी विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूने विहिरीत त्यांचा जीव गुदमरायला लागला. यात त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मोटारपंप बाहेर काढण्यासाठी शेतकरी विहिरीत उतरून विहिरीत साचलेल्या पाण्यात पडले असता शेतात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांना दिली. यानंतर तब्बल १८ तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

SCROLL FOR NEXT