Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : अंगावर विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; चिचटोला येथील घटना

Bhandara News : अचानकपणे जोरात मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. क्षणात अंगावर विज पडून शेतकरी यादोराव दिघोरे यांचा जागीच मृत्यु झाला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. याच दरम्यान भंडारा जिल्ह्यातील चिचटोला शेतशिवारातकडे जात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील चिंचटोला गावालगतच्या तलावाच्या आतील भागात असलेल्या शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर विज पडून मृत्यु झाल्याची घटना घडली. यादोराव बाळा दिघोरे (वय ५०) से या घटनेतील मृत झालेल्या (Farmer) शेतकऱ्याचे नाव आहे. चीचटोला येथील स्मशानभूमी असलेल्या नवतलावाच्या परीसरात असलेल्या शेताकडे यादोराव सोबत छत्री घेऊन निघाला होता. याच वेळी अचानकपणे जोरात मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. क्षणात अंगावर (Lightning Strike) विज पडून शेतकरी यादोराव दिघोरे यांचा जागीच मृत्यु झाला.

बकरी चरणाऱ्याला दिसला मृतदेह 

काही वेळानंतर पाऊस थांबला. यानंतर त्या परीसरात शेळ्या चारायला गेलेल्या पशु पालकाला यादोराव दिघोरे हे मृतवस्थेत जमिनीवर पडलेला दिसून आला. त्यानंतर हि घटना गावात व परीसरात पसरली. यानंतर कुटुंबीय व गावकऱ्यांनी यादोराव यांचा मृतदेह रुग्णालयात नेला. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT