Bhandara News updates, Latest Bhandara News Saam Tv
ऍग्रो वन

शेतकरी संतापला! वीज उपकेंद्रात केली तोडफोड १५० शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर आसगाव वीज उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा - भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करीत तोडफोड केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव येथे घडली आहे. या प्रकरणी तीन गावांतील सुमारे १५० शेतकऱ्यांविरोधात (Farmer) पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आसगाव वीज उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. (Bhandara News updates)

हे देखील पहा -

गेल्या आठ दिवसांपासून पवनी तालुक्यात कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान पवनी तालुक्यातील ब्रह्मी, बाचेवाडी या गावातील सुमारे 100 ते 150 शेतकरी आसगाव वीज उपकेंद्रावर धडकले. प्रवेशद्वार बंद असताना शेतकऱ्यांनी उड्या मारून आत प्रवेश करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत खिडक्या, दरवाजे तसेच इतर साहित्यांची तोडफोड केली.

या प्रकाराने कर्मचारी घाबरून गेल्याने त्यांनी तात्कळ पवनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या तक्रारीवरून सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध भादंवि 353,332,143,504,506 यासह शासकीय मालमत्ता विद्रुपिकरन अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT