अडीच कोटींच्या हारवेस्टरपायी शेतकऱ्यांनी विकली 17 एकर जमीन; कंपनीकडून फसवणूक! Saamtv
ऍग्रो वन

अडीच कोटींच्या हारवेस्टरपायी शेतकऱ्यांनी विकली 17 एकर जमीन; कंपनीकडून फसवणूक!

कंपनीने फसवलंय, आमच्यावर फाशी घेण्याची वेळ आलीय; मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या..!

विनोद जिरे

बीड : आपल्या कुटुंबाला आर्थिक बळकटी मिळावी, यासाठी गावखेड्यातील शेतकरी, शेतीला जोड धंदा म्हणून आपापल्या परीने, अनेक उद्योग व्यवसाय करत असतो. मात्र असाच जोडव्यवसाय करून सुखी आणि समृद्ध जीवन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीडमधील 2 शेतकऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून देखील उपासमारीची वेळ आली आहे. जोडधंद्यासाठी आणलेल्या हारवेस्टरपायी शेतकऱ्याला (Farmers) आपली 17 एक्कर शेती विकावी लागल्याने सातबारा कोरा झालाय. त्यामुळं कोट्यावधी रुपये खर्च करूनही कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय.

हे देखील पहा :

बीडच्या (Beed) तेलगाव येथील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल आणि त्यांचे शेतकरी मित्र अंगद विश्वंभर गुंदेकर, हे दोघेही शेती व्यवसायातून आपला व कुटुंबाचा गाडा चालवतात. मात्र शेती करत असतांना, आपण देखील जोडधंदा (Side Buisness) म्हणून काहीतरी केलं पाहिजे असं स्वप्न या दोन्ही शेतकऱ्यांनी बाळगलं. त्यासाठी त्यांनी आपल्या परिसराचा अंदाज घेत आणि ऊस उत्पादन तसं चांगलं असल्यानं हरवेस्टर घेण्याचा ठरवलं.

गेल्या चार- पाच वर्षांपूर्वी आपलं स्वप्न सत्यात उतरवत, शेतकरी जयप्रकाश आणि अंगद यांनी, मूळची अमेरिकन कंपनी असणाऱ्या जॉन डिअर (John Deere ) कंपनीचे हारवेस्टर घेतले. यासाठी त्यांनी खाजगी सावकारासह बँकेचे कर्ज घेतले. आणि कर्जासह परतफेड मिळून जवळपास अडीच कोटींची हारवेस्टर मशीन (harvester machine) जोडधंद्यासाठी आणली.

याविषयी शेतकरी जयप्रकाश तोष्णीवाल म्हणाले, की मी गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी मी हे मशीन विकत घेतलं आहे. ते मशीन आम्हाला आज दोन ते अडीच कोटी पर्यंत पडले आणि ज्या वर्षीपासून मशीन घेतले त्या वर्षापासून दुसऱ्या दिवसापासून या मशीनमध्ये प्रॉब्लेम येत आहेत. पहिल्या वर्षी किमान 70 ते 80 दिवसात मशीन खराब झाल्यानं उभा कराव लागलं. त्यामुळं आम्ही मशीन बदलून द्या अशी मागणी केली.

मात्र कंपनीने एक वर्ष वॉरंटी वाढवून दिली. आम्हाला वाटलं प्रॉब्लेम येत असतात, कंपनी (Company) आपल्या बरोबर आहे. मात्र, पुन्हा मशिन खराब झाली, पुन्हा दुरुस्त केली. मात्र मशीन दिवसेंदिवस काम काढत राहीली. याविषयी कंपनीला कर्मचाऱ्यांना बोललो, डीलरला बोललो, मात्र, कंपनी कसल्या प्रकारचे उत्तर देत नाही किंवा आमचा विचार पण करत नाही.

तर, या पाच वर्षात हे हारवेस्टर मशीन दुरुस्त करण्यासाठी अन बँकेचे (Bank) हप्ते भरण्यासाठी माझी 17 एक्कर जमीन विकावी लागलीय. आज, माझ्या कुटुंबासमोर उपासमारीची वेळ आहे. काय करावं हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे ही कंपनीही मल्टीनॅशनल कंपनी असल्यामुळे, आमचे प्रॉब्लेम वरिष्ठांपर्यंत जाऊ शकत नाहीत. कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला, फक्त सांगतात "हो आम्ही बघू म्हणून", याच्या पलीकडे काही उत्तर मिळत नाही.

जर कोट्यावधी रुपये खर्च करूनही कंपनीनं नाही बघितलं, तर आम्ही कुणाकड बघावं ? आज आमच्यासमोर आत्महत्या (Suicide) शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळं मुख्यमंत्री (CM) महोदय आणि शासनाला एकच विनंती आहे, या कंपनीने आम्हाला फसवलंय, त्यामुळं आम्हाला नुकसान भरपाई देण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगावं आणि आम्हाला न्याय द्यावा.

तर याविषयी दुसरे शेतकरी अंगद गुंदेकर म्हणाले, की मी जॉन डीअर (John Deere) कंपनीचे हारवेस्टर मशीन चार-पाच वर्षापूर्वी घेतले होते. त्या वेळेस पासून मी या हारवेस्टरला वैतागून गेलो आहे. त्यात डीलर ची अरेरावी चालू आहे. कंपनी कुठलेही लक्ष देत नाही, यामध्ये आम्ही खूप भरडून निघालो आहोत. मी शेतीला जोड धंदा म्हणून, या शुगर केन हार्वेस्टर कडे वळालो, जॉन डीअर कंपनी ही नामांकित कंपनी आहे.

हे एकदम चांगल्या कंपनीचे हार्वेस्टर आहे असे आम्हाला कंपनी वाल्यांनी सांगितले आहे. म्हणून आम्ही ते हार्वेस्टर खरेदी केले, मात्र हार्वेस्टर घेतल्यापासून एवढा त्रास आम्हाला झालाय, की याची कुठलेच स्पेअर वेळेवर भेटत नाहीत. कंपनीचा आम्हाला सपोर्ट नाही, एक वेळेस मशीन बंद पडले, तर पंधरा पंधरा दिवस शेतात मशीन उभा राहते. यामुळं लेबरचा खर्च, बँकेचे हप्ते भरण्यासाठी जमीन विकावी लागली.

"आज एवढी बेकार वेळ माझ्यावर आलेली आहे, मी मशीन मालक असून माझ्यावर आता ऊसतोडीची उचल घेऊन, कारखान्याला (Sugar Factory)जायची वेळ आहे". त्यामुळं मी खूप वैतागलो आहे, आर्थिक अडचणीत आहे. समाजातली, बँकेतली पत गेलीय, सिबिल खराब झाला आहे, बँकेवाले दारात उभा राहू देत नाहीत, अशी वेळ माझ्यावर आली आहे. ही वेळ फक्त जॉन डीअरच्या मशीनमुळं आली आहे, माझी मागणी एकच आहे, की हे मशीन परत घेऊन आमची झालेली नुकसान भरपाई कंपनीने द्यावी. अशी माझी कंपनीला विनंती आहे.

त्याचबरोबर माझ्यासारखे अनेक शेतकरी या कंपनीवर विश्वास ठेवून बसलेले आहेत. मोठमोठ्या मशनरी घेत आहेत, त्यामुळं ते तरी शेतकरी या गुंदेकर सारखे कंपनीने बळी पडू नयेत. यासाठी महाराष्ट्र सरकार व शासनाने या कंपनीवर कठोरात कठोर कारवाई करावी. अन आम्हाला न्याय द्यावा. अशी मागणी शेतकरी अंगद गुंदेकर यांनी केलीय.

दरम्यान, जयप्रकाश आणि अंगद या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसोबत जोड धंदा म्हणून हे हार्वेस्टर मशीन घेतलं होतं. ज्याने करून माजलगाव तालुक्यात असणाऱ्या 2 कारखान्यांमुळे आणि परिसरात असलेल्या ऊसामुळं आपला चांगला व्यवसाय होईल. मात्र, त्यांच्या या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

या हार्वेस्टर पाई जयप्रकाश तोष्णीवाल यांना आपली 17 एकर शेती विकावी लागली, तर अंगद गुंदेकर यांनी देखील शेती विकली. त्यामुळं या हार्वेस्टरपाई कोट्यावधी रुपये खर्च झाल्यानं, त्यांचा सातबारा आज कोरा झालाय. त्यामुळे आज जगावं कसं ? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला असून मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला न्याय द्यावा. अशी आर्त हाक या दोन्ही पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT