Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

Akola Woman Burns Over 50% Body Injury: अकोला येथे गंभीर जळालेल्या महिलेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना थेट फोन करून त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत.
Deputy CM Eknath Shinde speaking to Akola Police Chief about burn case incident.
Deputy CM Eknath Shinde speaking to Akola Police Chief about burn case incident.Saam Tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि शिंदे सेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना फोन केला. आणि अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर भाजलेल्या अर्थातच 50 टक्के जळालेल्या महिलेची चौकशी केली. त्यानंतर लागलीच माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना फोन करून महिलेच्या प्रकृती संदर्भात चौकशी म्हणजेच विचारणासाठी रुग्णालयात पाठवले.

Deputy CM Eknath Shinde speaking to Akola Police Chief about burn case incident.
Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

थोड्यावेळातच शिंदे सेनेचे माजी आमदार बाजोरिया आणि त्यांचे कार्यकर्ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. बाजोरियांनी महिलेच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर ती जवळपास 50% पेक्षा अधिक भाजलेल्या अवस्थेत असल्याच समजलं. महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ती काहीच बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे त्यांनी सांगितलं. रूपाली खंडारे असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर दोन दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरू आहे. अर्थातच ती 23 सप्टेंबर रोजी रात्री अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. तिच्या पतीने तिला उपचारासाठी दाखल केलं होतं.

Deputy CM Eknath Shinde speaking to Akola Police Chief about burn case incident.
Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

दरम्यान, महिलेसोबत नेमकं काय घडलं, हे पोलीस चौकशीनंतरच समोर येणार असल्याचे माजी आमदार बाजोरियांनी सांगितलं आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षकांना कळविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, तसेच या प्रकरणी योग्य तपास करून सर्व बाबी स्पष्ट करण्याचे सूचनाही उपमुख्यमंत्री एका शिंदे यांनी दिल्या आहे. तर महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहे, गेल्या दोन दिवसापासून तिच्यावर योग्य तो उपचार केला जात असल्याचं माहिती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय सोनवणे यांनी दिली.

Deputy CM Eknath Shinde speaking to Akola Police Chief about burn case incident.
Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

पोलिसांनी सांगितलं प्राथमिक कारण -

23 सप्टेंबर सप्टेंबर रोजी खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि काही पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले होते. तिचं प्रथम बयान नोंदवण्यात आलं होतं. तिने सांगितल्याप्रमाणे घराच्या परिसरात अर्थातच अंगणात झाडू मारल्यानंतर जो कचरा जमा झाला होता. तो जाळत असताना अंगात घातलेल्या कपड्याला देखील आग लागली, अन त्याच आगीत आपण जळाली असल्याचे तिने सांगितले. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार पुन्हा चौकशीसाठी रुग्णालयात पोलीस गेले असता ती बयान देण्याच्या स्थितीत नाही, असं खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितले.

तिच्या बहिणींने घेतला सासरच्या लोकांवर आक्षेप..

रूपाली जळाली असल्याची माहिती तिच्या नाशिकच्या मोठ्या बहिणी जवळ पोचली. त्यानंतर बहीण अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली. इथे तिने तिच्या पतीवर संशय घेतला, त्यानंतर थेट तिने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क केला. शिंदेंनी फोनवर योग्य चौकशी केल्या जाणार असल्याच आश्वासन तिला दिल. त्यानंतर शिंदेंनी अकोला पोलीस अधीक्षकांसोबत संपर्क साधत योग्य चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर पक्षाचे माजी आमदार बाजोरिया यांना फोन करून या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवण्याचं कळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com