ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फुफ्फुसांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्याने खराब फुफ्फुस सुधारण्यास मदत होते, जाणून घ्या.
हळदीमध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे फुफ्फुसांची सूज कमी करण्यास मदत करतात.
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी- इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. जे फुफ्फुसांची सूज कमी करण्यास आणि फुप्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
लसूणमध्ये सल्फर घटक असतात जे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक आणि ब्रोकोलीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन असतात, जे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी एक पावरफुल अँटीऑक्सिडंट आहे जे खराब फुफ्फुस सुधारण्यास मदत करते.
फुफ्फुसांचा आजार असल्यास ग्रीन टीचे सेवन करा. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे फुफ्फुसांची सूज कमी होते.