Beed: बँकेचा अजब कारभार; बोजा चढवून शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यास नकार! विनोद जिरे
ऍग्रो वन

Beed: बँकेचा अजब कारभार; बोजा चढवून शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यास नकार!

बीडच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोळगाव शाखेमध्ये, धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीडच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोळगाव शाखेमध्ये, धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या 9 एक्कर जमिनीवर बोजा चढवला, मात्र त्या शेतकऱ्याला पीक कर्जचं दिलं नाही.

हे देखील पहा-

दादासाहेब हाकाळे रा. तांदळा ता. गेवराई असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी दादासाहेब हाकाळे या शेतकऱ्यांनी, पीक कर्ज काढण्यासाठी सातबारा, दोन हजाराचे स्टाँप पेपर आणुन दिले. बेबाकी पत्र, कागदपत्रे दाखल करण्यात आले.

आज होईल उद्या होईल एक महिना झाला आहे. परंतु बँकेच्या टाळाटाळीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करुन आपली फाईल दादासाहेब हकाळे यांनी सादर केली आहे. तर बॅक शाखा व्यवस्थापकाने सदर शेतकऱ्यांच्या जमिनीवर तलाठ्याकडे लेखी पत्रव्यवहार करून बोजा चढवला.

पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही. यासह तांदळा येथील हनुमान हकाळे, अंनता हकाळे,मधुकर सिरसट व इतर शेतकऱ्यांना पण अशाच प्रकारे पीककर्जापासून वंचित ठेवल्याचे, तांदळा येथील शेतकरी हनुमान हकाळे यांनी सांगितले. यामुळं पीककर्ज तात्काळ द्यावं, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT