तुमचा आधार कार्ड हा 12 अंकी एक विशिष्ट क्रमांक आहे आणि तो तुमची ओळख म्हणून काम करतो. बँक खाते उघडण्यापासून पासपोर्टसाठी अर्ज करण्यापर्यंत, ई-तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार कार्ड Adhar Card हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. ओळख प्रस्थापित करण्यासाठी त्याची सेवा अनेक ठिकाणी घेतली जाते. मात्र, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्यासोबत तुमचा मोबाईल नंबर नोंदवणे महत्त्वाचे आहे.
हे देखील पहा-
तुम्ही तुमच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटवरून तुमच्या ई-मेल आणि मोबाईल क्रमांकासह पडताळणी करू शकता, जे नावनोंदणीच्या वेळी किंवा नवीनच आधार अपडेट दरम्यान घोषित केले आहे.
तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी जोडलेला आहे की, नाही हे तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही त्याला प्राधिकरणाच्या वेबसाइटवरून काही मिनिटांत शोधू शकता. फक्त तुम्हला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.-
सर्वप्रथम, ब्राउझर उघडा आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या चिन्हाच्या खाली माझे आधार वर टॅप करा.
आधार सेवा अंतर्गत स्क्रीनवर एक ड्रॉप डाउन मेनू उघडेल, त्यानंतर Verified Registered Mobile किंवा E-mail ID वर क्लिक करा.
तुमच्या मोबाइल सिस्टमवर एक नवीन टॅब उघडेल. येथे, ह्या नंबर ची पडताळणी करू इच्छिता असा आपण आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी टाका.
पुढच्या वेळी कॅप्चा कोड इंटर करा, आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा.
आता, प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक जर प्राधिकरणाच्या रेकॉर्डशी जुळत असेल, तर तो स्क्रीनवर फ्लॅश होईल की तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर आमच्या रेकॉर्डमधून आधीच सत्यापित झाला आहे. आणि महत्वाचे लक्षात ठेवा मोबाइल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करता येत नाही. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.